मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या आणि अजरामर चित्रपटांपैकी एक म्हणजे अलका कुबल यांचा माहेरची साडी'.
आज ३० वर्ष उलटले तरी प्रेक्षक आजही प्रेक्षकांच्या ओठांवर या चित्रपटाचं नाव आहे.
मराठीतील दिग्गज अभिनेत्री अलका कुबल यांनी ‘माहरेची साडी’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या सोशिक मुलगी व सूनेच्या भूमिकेने प्रेक्षकांना अक्षरशः रडवलं होतं.
आता या चित्रपटाचा पुढचा भाग लवकरच येणार अशी चर्चा रंगली आहे. त्याविषयी अलका कुबल यांनी आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे.
झी मराठीच्या अवॉर्ड’ सोहळ्यात अलका कुबल यांना 'माहेरची साडी २ मध्ये अलका कुबल सुनेचा छळ करताना दिसणार आहेत, असं आम्हाला कळलं', असं विचारण्यात आलं.
यावर उत्तर देताना अलका कुबल म्हणाल्या, 'मी पण याबद्दल ऐकलं. पण मला याबाबत नक्की काहीच सांगता येणार नाही.'
अलका कुबल यांच्या या उत्तरामुळे चित्रपटाच्या सिक्वेल बाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता कायम आहे.
आता ‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या पुढच्या भागातून अलका कुबल यांच्या अभिनयाची जादू पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार का हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.