अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आजही घराघरात लोकप्रिय आहेत. कौटुंबिक भूमिका, दैवी भूमिका यात त्यांचा हातखंडा आहे.
अलका कुबल यांना दोन मुली आहेत. दोघीही अभिनय सोडून वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
या दोघांना दोन मुली आहेत. कस्तुरी व ईशानी अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत.
त्यांची एक मुलगी पायलट आहे तर आता दुसरीने देखील कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
अलका यांची धाकटी मुलगी कस्तुरी परदेशात एमबीबीएस करतेय तिला डर्मिटोलॉजिस्ट बनायचं आहे.
आता अखेर त्यांच्या मुलीला अधिकृत डॉक्टरची पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे.
अलका कुबल यांनी लिहिलंय कि, 'कस्तुरी ने पहिल्याच प्रयत्नात FMGE परवाना परीक्षा यशस्वीपणे पास केली आज पासून Dr. Kasturee Athalye'
अलका कुबल यांच्या मुलीवर चाहते तसेच कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.