आलिया भट्ट ही अभिनेत्री सध्या प्रेग्नंसी आणि वर्कलोड एकत्र सांभाळताना दिसत आहे. गरोदरपणा हे बाईचं करिअर संपवतं असं म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आलिया कामापासून प्रमोशनपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळताना दिसत आहे.
येत्या 5 ऑगस्टला तिचा डार्लिंग्ज नावाचा एक अनोखा सिनेमा नेटफ्लिक्स वर प्रदरहित होणार असून तिने निर्मित केलेला हा पहिला सिनेमा आहे. सध्या आलिया याच सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या प्रेग्नंसी आणि कामाचा मेळ कसा बसवला यावर एकूण मत मांडत एक गोष्ट शेअर केली आहे. आलिया सध्या बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये सुद्धा झळकताना दिसत आहे.
तिच्या पहिल्यावहिल्या हॉलिवूड सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ती प्रेग्नन्ट होती आणि देशाबाहेर शूट करतानाचा अनुभव सांगत तिने अनेक गोष्टी शेअर केल्या.
हार्ट ऑफ स्टोन असं या सिनेमाचं नाव असून ती यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
ती असं सांगते, “पहिलाच हॉलिवूड सिनेमा तो ही ऍक्शनने परिपूर्ण आणि मी प्रेग्नन्ट होते. त्यात देश वेगळा, कास्ट वेगळी, माझी टीमसुद्धा वेगळी होती. मला सगळं नेमकं कस सांभाळता येईल याचं काहीसं दडपण होतं पण तिथली लोक आणि एकूणच सिनेमाची टीम एवढी छान होती की त्यांनी माझी खूप काळजी घेतली. वेळोवेळी माझी विचारपूस करण्यापासून अगदी पाणी, जेवण सगळ्याची आठवण ते करून देत होते. मला कुठेही त्रास होणार याची टीमने काळजी घटली. मी हा अनुभव कधीच विसरणार नाही.”
आलिया स्वतःच्या गरोदरपणाला स्वतःच्या कामांमध्ये एक अडथळा म्हणून न बनू देता त्या परिस्थितीत सुद्धा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.
तिच्यासाठी हे वर्ष बरंच स्पेशल होतं. अगदी गंगुबाई सिनेमाच्या यशापासून ते लग्न आणि गोड बातमीपर्यंत अनेक अर्थाने हे वर्ष तिच्यासाठी खास ठरलं आहे.