आलिया भट्टने अगदी काहीच महिन्यांपूर्वी आई होण्याची बातमी शेअर केल्यावर चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं होतं.
आलिया प्रेग्नन्ट असतानाही स्वतःची योग्य काळजी घेत फुल फॉर्मात कामावर लक्ष केंद्रित करताना दिसून आली होती.
नुकतीच आलिया तिचा नवरा रणबीर सह एका प्रमोशन इव्हेंटला जाताना दिसून आली होती.
आलियाच्या या फोटोमध्ये तिचा बेबी बम्प साफ दिसत असून तिच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळाच ग्लो बघायला मिळत आहे.
चाहत्यांनी आलिया आणि रणबीर यांच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला असून या दोघांचे क्युट फोटो सध्या viral होताना दिसत आहेत.
आलियाने ब्राऊन रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे तर रणबीर ऑल ब्लॅक लुकमध्ये दिसून आला आहे.
आलिया तिचा बेबी बम्प flaunt करत इव्हेंटला जाताना दिसून आली आहे.
आलियाचा डार्लिंग्स हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला असून सध्या त्याची बरीच चर्चा आणि सिनेमाचं खूप कौतुक होताना दिसत आहे.
आलिया आणि रणबीरचा ब्रह्मास्त्र सिनेमा सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार आहे. तर सिनेमाचं नाव गाणं येत्या 8 ऑगस्टला प्रेक्षकांसमोर येणार आहे.