बॉलीवूड सुपरस्टार अजय देवगण बायको काजोल सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. दोघांनी मिळून कोट्यवधींची प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
अजय देवगणने 2021 मध्ये मुंबईतील जुहू भागात 47.5 कोटी रुपयांना एक आलिशान बंगला खरेदी केला होता. आता, जवळपास दोन वर्षांनंतर, त्यांनी 45.09 कोटी रुपयांना पाच ऑफिस युनिट्स खरेदी केल्या आहेत.
डेटा विश्लेषक फर्म 'सीआरई मेट्रिक्स'नुसार, अजय देवगणने अंधेरी पश्चिम भागात ही नवीन गुंतवणूक केली आहे. या पाच कार्यालयीन युनिटचे एकूण क्षेत्रफळ 13,293 चौरस फूट आहे.
अजय देवगणची ही नवीन प्रॉपर्टी वीर देसाई रोडला लागून असलेल्या ओशिवरा येथील सिग्नेचर बिल्डिंगमध्ये आहे. या पाच युनिटपैकी तीन युनिट सिग्नेचर इमारतीच्या 16व्या मजल्यावर आहेत.
या पाच युनिटची नोंदणी कार्यालयीन कागदपत्रांमध्ये मात्र विशाल वीरेंद्र देवगण या नावाने आहे. विशाल वीरेंद्र देवगण हे अजय देवगणचे खरे नाव आहे.
मोठ्या पडद्यावर तो अजय या नावाने ओळखला जातो. अजय देवगणने खरेदी केलेल्या या प्रॉपर्टीची खूपच चर्चा होत आहे.
काही दिवसांपूर्वीच अजय देवगणची पत्नी आणि अभिनेत्री काजोलनेही मुंबईत 16.5 कोटी रुपयांना एक अपार्टमेंट खरेदी केले होते. काजोलने एप्रिल महिन्यातच भारत रिअॅलिटी व्हेंचर्सकडून ही मालमत्ता खरेदी केली आहे.
पती पत्नीनं मिळून मुंबईत अशी कोट्यवधींची प्रॉपर्टी खरेदी केली आहे.