NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 68th National Film Awards : अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

68th National Film Awards : अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

68वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा आज पार पडला. अभिनेता अजय देवगणसह मराठी कलाकारांचाही राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

112

काही दिवसांआधी 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्करांची घोषणा करण्यात आली होती. आज या पुरस्कारांचं दिल्लीत वितरण करण्यात आलं. देशाच्या राष्ट्रपती द्रौपती मुनमु यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

212

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना आशा पारेख यांनी पुरस्कारासाठी सर्वाचे आभार मानले.

312

गायक राहूल देशपांडे याला मी वसंतराव सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

412

गोष्ट एका पैठणीचीचे दिग्दर्शक शांतनू रोडे यांनी उत्कृष्ट मराठी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला.

512

विशेष उल्लेखनीय फिचर फिल्मसाठी जून या मराठी सिनेमासाठी अभिनेता सिदार्थ मेननला पुरस्कार देण्यात आला.

612

विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म गोदाकाठ आणि अवांचित या मराठी चित्रपटासाठी अभिनेता किशोर कदम यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

712

तानाजी : द अनसंग वॉरियर या सिनेमासाठी अभिनेता अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

812

मी वसंतराव सिनेमाच्या उत्कृष्ट साउंड डिझाइनसाठी अनमोल भावे यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

912

सर्वोत्कृष्ट बालकलाकार अनिश गोसावी याला चित्रपट टकटकसाठी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आल.

1012

सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून आकांक्षा पिंगळे हिला चित्रपट सुमीसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

1112

त्याचप्रमाणे तिसरा सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून दिव्येश इंदुलकर याला चित्रपट सुमीसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

1212

सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट फनरल मराठी चित्रपटासाठी विवेक दुबे यांनी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

  • FIRST PUBLISHED :