अजय देवगणच्या दृश्यम च्या दोन्ही भागांमध्ये त्याची मुलगी म्हणून झळकलेली अभिनेत्री म्हणजे इशिता दत्ता. तिची ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती.
इशिताने अभिनेता वत्सल शेठ सोबत सहा वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. त्यांची जोडी चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.
वत्सल शेठ आणि इशिता दत्ताच्या घरात पाळणा हलणार आहे.
अभिनेत्री गरोदर असून नुकतेच तिला बेबी बंपसह स्पॉट करण्यात आले. यानंतर इशिताने छायाचित्रकारांना हसतमुखाने अनेक फोटो काढू दिले.
इशिता गरोदर असली तरी तिने अद्याप प्रेग्नेंसीबाबत कोणतीही पोस्ट किंवा माहिती दिलेली नाही.
दोन वर्षांपूर्वीही इशिता दत्ताच्या गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर अभिनेत्रीने पुढे येऊन या फक्त अफवा असल्याचं सांगितलं होतं.
आता मात्र ती प्रेग्नेंट आहे त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
या दोघांचे चाहते खूपच खुश असून ते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे.