आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे सध्या बॉलिवूडमधील चर्चेीत कपल आहे. या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले आहे, अशा परिस्थितीत दोघांमध्ये काहीतरी खास असल्याची चर्चा आहे. आता या सगळ्या चर्चा सुरू असताना अभिनेत्याने लग्न आणि रिलेशनशिप यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
आदित्य रॉय कपूर आजकाल त्याच्या पहिल्या OTT शो 'द नाईट मॅनेजर' ला मिळालेल्या यशामुळे त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. सध्या आदिच्या त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याच्या लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत असतो. अभिनेत्री अनन्या पांडेसोबत डेटिंगच्या अफवांदरम्यान, जेव्हा दोघे स्पेनमध्ये एकत्र वेळ घालवताना दिसले, तेव्हा लोकांना यांच्यात काही तरी असल्याचं समजलं. नुकताच तो आपले रिलेशनशिप, लग्न आणि ट्रोलिंग यावर खुलेआम बोलला.
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे दोघेही आजकाल बी-टाउनमध्ये टॉपचा गॉसिप्सचा विषय बनला आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले आहे, अशा परिस्थितीत दोघांमध्ये काहीतरी खास असल्याची चर्चा आहे. आता या वृत्तांवर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य त्याच्या नात्याबद्दल काहीच का सांगत नाही? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीत त्यांने लोकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्याची ही उत्तर ऐकल्यानंतर काही जण त्याचे कौतुक करतील तर काही म्हणतील हा काय सांगतोय.
आदित्यने नुकताच ई-टाइम्सशी संवाद साधला. जिथे त्याला त्याच्या नात्याबाबत विचारण्यात आले. तो म्हणाला, 'मला वाटतं, हा सध्या चर्चेचा विषय राहू द्या. जोपर्यंत त्याची चर्चा होत आहे, तोपर्यंत ही चांगली गोष्ट आहे. अंदाज लावणे चांगले आहे, गोष्टी नैसर्गिक मार्गाने वाहू द्या. फोटो सौजन्य- @adityaroykapur/Instagram
आदित्य रॉय कपूरच्या या उत्तरानंतर त्याला विचारण्यात आले की, येत्या काळात तो कधी सेटल होणार? प्रश्न ऐकून तो म्हणाला, 'माझ्या सर्व मित्रांची लग्ने झाली आहेत, पण मला काही तरी चुकण्याची भीती वाटत(Fear of Missing Out) नाही. कारण आत्तापर्यंत मला फक्त जोमो अर्थात जॉय ऑफ मिसिंग आउटची नभीती वाटते. जेव्हा गोष्टी घडायच्या आहेत तेव्हा त्या घडतील. त्यासाठी मी माझी झोप आतापासूनच का खराब करू.
तसेच, आजच्या काळात जेव्हा बहुतेक अभिनेते सोशल मीडियावर सक्रीय असतात, तर काही सक्रीय नाहीत. आदित्य दुसऱ्या श्रेणीत येतो. तो सक्रीय असो वा नसो, कोणीही ट्रोलिंगपासून वाचू शकत नाही आणि आदित्यची त्याला सामोरे जाण्याची स्वतःची एक वेगळी पद्धत आहे. फोटो सौजन्य- @adityaroykapur/Instagram
तो म्हणाला की, मी सध्या सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नाही, त्यामुळे मला आत्तापर्यंत फारसा काही त्रास झालेला नाही. मी खूप कमी गोष्टी पोस्ट करतो. पण खरं सांगू, मला लोकांच्या प्रतिक्रिया दिसत नाहीत. कधीकधी लोक मला स्क्रीनशॉट पाठवतात. अनेकवळा त्या फिल्टर केलेल्या असतात. फोटो सौजन्य- @adityaroykapur/Instagram
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आदित्य रॉय कपूर अलीकडे Disney+ Hotstar वर रिलीज झालेल्या 'नाईट मॅनेजर 2' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. यामध्ये आदित्यसोबत अनिल कपूर आणि शोभिता धुलिपाला हे देखील मुख्य भूमिकेत होते. फोटो सौजन्य- @adityaroykapur/Instagram