प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या आगामी आदिपुरुष चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी लाँच करण्यात आला आणि यावेळी क्रितीच्या लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधलं.
या चित्रपटात माता सीतेची भूमिका क्रिती साकारणार असून तिने या भूमिकेवर पूर्ण मेहनत घेतल्याचं दिसत आहे. आता निर्मात्यांनी देखील तिचा लूक सुंदर बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही.
क्रितीने या सोहळ्यासाठी खास पांढरी आणि सोनेरी काठ असलेली साडी परिधान केली होती.
पण ही साधी दिसणारी साडी नसून त्याच्यावर चक्क 24 कॅरेट सोन्याची नक्षी होती. या साडीवर तांबे आणि सोन्याच्या तारांनी काम करण्यात आले होते.
फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांच्या कलेक्शनमधून ही साडी निवडली आहे. या सुंदर साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
ही एक प्रकारची विंटेज साडी होती, जी केरळमधील कॉटन फॅब्रिकपासून बनवली गेली होती. साडीवर खादीच्या ब्लॉक प्रिंट्स दिसत होत्या आणि 24 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला होता.
माता सीतेची भव्यता दाखवण्यासाठी या प्रकारची साडी क्रितीसाठी तयार करण्यात आली होती. या साडीत क्रिती खूपच शोभून दिसत होती.
क्रितीने नेसलेल्या या साडीची आता सगळीकडेच चर्चा आहे.