बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने (Yami Gautam) 4 जूनला अचानक सगळ्यांनाच सुखद धक्का देत दिग्दर्शक आदित्य धार (Aditya Dhar) सोबत विवाह केला. यामीने अगदी वैयक्तिकरित्या हो सोहळा पार पाडला होता. पाहा यामीच्या लग्नाचे काही अनसीन फोटो.
यामीने हिमाचल प्रदेशा या आपल्या निवासस्थानी मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत विवाह केला.
कोरोनाचे नियम पाळत यामी आणि आदित्यने अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं.
लग्नासाठी केवळ 18 पाहूणे उपस्थित होते. ज्यातील वर पक्षातील फक्त 5 लोक आले होते.
हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर येथे यामीने अलिशान घर खरेदी केलं आहे. याच ठिकाणी दोघांचा विवाहसोहळ संपन्न झाला.
दोघांनी लग्नापूर्वी आपलं नात उघडं केलं नव्हतं. तर त्यांच्या विवाहाने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे.
'उरी - द सर्जीकल स्ट्राईक' या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. याशिवाय आदित्य ने 'विकी डोनर' सारख्या चित्रपटाचही दिग्दर्शन केलं होते. 'उरी' साठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार देखिल मिळाला होता.
यामी लवकरच 'भूत पोलिस', 'द थर्सडे', 'दासवी' या चित्रपटांत दिसणार आहे.