बॉलिवू़ड तसेच साउथ मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री तमन्ना भाटीया (Tamannah Bhatia) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली जादू दाखवत आहे. काही दिवसांपूर्वीच तमन्नाची वेबमालिका प्रदर्शित झाली आहे. तर या विषयी बोलताना तमन्नाने डिजीटल प्लॅटफॉर्मने सुपरस्टार ही व्याख्या कशी बदलत आहे हे ही सांगितलं आहे.
तमन्नाने 'द 11th हावर' आणि 'नोव्हेंबर स्टोरी' या वेबमालिकांत काम केलं आहे. मागील महिन्यातच तिची 'द 11 हावर' ही वेबमालिका प्रदर्शित झाली होती.
याविषयी बोलताना माध्यम निवडण्याबाबत तमन्ना म्हणाली की "कोणतही एकच नाही तर मला दोन्ही हवेत. जस एखाद्याकडे मोठी फॅनफॉलोइंग आहे पण 10 वर्षापूर्वीच्या पीढीसाठी आज हे सगळं कठीण आहे. कारण आपण सध्या ज्या परिस्थितीतून जात आहोत, महामारी, लॉकडाउन सगळ काही वेगळं आहे. ज्या प्रकारे चित्रपट पाहिला जायचा ते आता बदलत आहे."
त्यामुळे स्टार ही संकल्पना पूर्णपणे बदलत आहे. एका मुलाखतीत तमन्ना बोलत होती.
लोक चित्रपट आणि मालिका हे त्या विशेष आशयासाठी पाहत आहेत तर कोणत्याही स्टार किंवा अभिनेत्यासाठी नाही.
पुढे ती म्हणाली, "मी 10 वर्षीपुर्वीची स्टारडमची संकल्पना ही प्रामाणिक चाहता वर्ग निर्माण करत होती."
"सुदैवाने मी याचा अनुभव घेतला आहे." असही ती म्हणाली.
नोव्हेंबर स्टोरीज मध्ये तमन्नाने पहिल्यांदाच क्राईम थ्रीलर वेबमालिकेत काम केलं आहे.
तमन्नाने सांगितलं की यातील पात्र हे अतिशय वेगळ होतं. यापूर्वी तिने कधीही अशाप्रकारचं काम केलं नव्हतं.
मागील दशकापासून तमन्ना साउथ आणि बॉलिवूड चित्रपटांत प्रेक्षकांच मन जिंकत आहे.
तमन्नाचं ओटीटीवरील पदार्पण तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच पर्वणी ठरत आहे.