अभिनेत्री सुखदा खांडकेकर हे नाव आता नवं नाही. अनेक नाटकांत तसेच हिंदी मालिकांमध्ये सुखदाने काम केलं आहे. पाहा तिचे मनमोहक फोटो. फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम
अभिनेत्री सुखदा खांडकेकर सध्या 'अहिल्या' या सोनी टीव्हीवरील मालिकेत झळकत आहे.
निळ्याशार साडीत सुखदा अगदी सुंदर दिसत आहे.
सुखदा ही प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकर याची पत्नीही आहे.
अहिल्या या मालिकेत ती ऐतिहासिक भूमिकेत दिसत आहे.
साडीत सुखदाचं सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे.
सुखदाने काही हिंदी चित्रपटांतही काम केलं होतं. बाजीराव मस्तानी चित्रपटात ती दिसली होती.
२०१३ मध्ये सुखदाने अभिजीतशी लग्नगाठ बांधली होती. मराठी सिनेसृष्टीतील ते एक पॉवर कपल म्हणून ओळखले जातात.
आभास हा, घरकूल, आम्ही सारे खवय्ये या मराठी मालिकांमध्यही ती झळकली होती.