NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Rekha Full Name : रेखानं कधीच नाही लावलं आपल्या नावापुढे आडनाव; अभिनेत्रीचं पूर्ण नाव आहे तरी काय?

Rekha Full Name : रेखानं कधीच नाही लावलं आपल्या नावापुढे आडनाव; अभिनेत्रीचं पूर्ण नाव आहे तरी काय?

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आजही लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. अभिनेत्री आजवर रेखा याच नावानं प्रसिद्ध झाली आहे. पण खरं नाव आहे तरी काय?

111

80 च्या दशकातील अभिनेत्री रेखा हिची आजही सगळीकडे चर्चा होते. आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान मिळवलं.

211

अभिनेत्री रेखा आज वयाच्या 68 व्या वर्षीही सौंदर्याच्या बाबतीत नवोदित अभिनेत्रींनाही टक्कर देतात.

311

रेखा यांनी एकेकाळी मोठ्या पडद्यावर बॅक टू बॅक हिट चित्रपट देत लोकांना अक्षरशः वेड लावलं होतं.

411

उत्तम अभिनेत्रीबरोबर रेखा उत्तम डान्सर आहेत. नटण्या सजण्याची प्रचंड आवड असलेल्या रेखा आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घालतात.

511

रेखा यांचा जन्म 102 ऑक्टोबर 1954साली झाला. जन्मापासूनच दिसायला सुंदर असलेल्या रेखा यांना आजही नॅचरल ब्युटी म्हणतात.

611

70च्या दशकात रेखा-अमिताभ एकीकडे त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असायचे. तर दुसरीकडे, त्यांच्या प्रेम आणि वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चा झाल्या.

711

1990 साली रेखा यांचं लग्न मुकेश अग्रवाल यांच्याशी झालं पण वर्षभरात त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा पासून त्या सिंगल आहेत.

811

सिलसिला, उमराव जान, दो आँखे, घर, सुहाग, संसार, सारख्या अनेक सिनेमात रेखा यांनी काम केलं.

911

रेखाला पाहण्यासाठी चाहते आजही गर्दी करतात. तरूणांपासून वृद्धांपर्यंत रेखा सर्वांना आवडते.

1011

आजवर अभिनेत्री रेखा याच नावानं प्रसिद्ध झाली. पण तिचं खरं नाव रेखा नाहीये असं म्हटलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

1111

अभिनेत्री रेखाचं खरं नाव भानुरेखा असं आहे. ती केवळ रेखा असंच नाव लावते. तर तिचं आडनाव गणेशन असं. भानुरेखा गणेशन असं रेखाचं पूर्ण नाव आहे.

  • FIRST PUBLISHED :