सध्याच्या काळात फिट राहणं हे फारच गरजेचं आहे. अभिनेत्री तसंच फिटनेस क्वीन मलायका अरोरा नेहमीच तिच्या चाहत्यांना फिटनेसचे धडे देत असते. तिने केलेली ही आसनं पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
मलायका ही बॉलिवूडची अतिशय फिट अभिनेत्री आहे.
मलायका फिटनेसच्या बाबतीत लोकप्रिय आहे. नेहमीच ती वेगवेगळ्या प्रकारचं वर्कआउट करताना दिसते.
मलायकाचं स्वत:चं फिटनेस सेंटर आहे.
सोशल मीडियाद्वारे ती नेहमीच फिटनेसचे धडे देत असते.
अभिनेता वरुण धवन कोरोना संक्रमित झाल्यानंतर, मलायकाने सांगितलेली ब्रिथिंग एक्सरसाइज कोरोनामुक्त होण्यासाठी कामी आल्याचंही त्याने सांगितलं होतं.
मलायका इतरही सेलिब्रिटीजना गाईड करत असते.
मलायका 47 वर्षाची असून तिचा फिटनेस तरूणांनाही लाजवेल असा आहे.
मलायका 18 वर्षीय मुलाची आई देखील आहे. अरबाज खानसोबत तिचं लग्न झालं होतं, परंतु ते विभक्त झाले.
मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते.
मलायका अभिनेता अर्जून कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे कपल कायमंच चर्चेत असतं.
मलायका सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. ती निरनिराळे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडिया शेअर करत असते.
मलायका अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रियॅलिटी शोची जज म्हणून रिप्लेस करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
योग, आसनं हे प्रत्येकासाठी फायदेशीर असून मलायका नेहमी योग करण्याचा सल्ला देते.