अभिनेत्री कुंजिका काळवींट तिच्या अभिनयानमुळे सर्वांच्या पसंतीस उतरली.
तिच्या सौंदर्यानं ती सर्वांना घायाळ करत असते.
कुंजिका सध्या स्टार प्रवाहवरील शुभविवाह मालिकेत काम करतेय.
स्वामिनी मालिकेतून तिनं टेलिव्हिजनवर पदार्पण केलं.
त्यानंतर ती परत आलीये मालिकेत ती दिसली. तिची सायली ही भूमिका प्रेक्षकांना आवडली.
कुंजिका सोशल मीडियावर अँक्टिव्ह असते. तिचं फोटोशूट सर्वांना आवडतं.
पण आता कुंजिकाला आलिया भट्टची भुरळ पडल्याचं पाहायला मिळतंय.
आज आलियाच्या गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा रिलीज होऊन एक वर्ष झालं. त्यानिमित्तानं कुंजिकानं थ्रोबॅक फोटो शेअर केलाय.
कुंजिका गंगुबाईच्या लुकमध्ये असून तिच्या नजरेनं तिनं सर्वांचं लक्ष वेधलंय. 'गंगू चांद थी और चांद रहेगी', म्हणत कुंजिकानं हे फोटो शेअर केले.