नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या फारच चर्चेत आहे. तिच्या डान्स इतकीच तिच्या फॅशनसाठीही ती फेमस आहे. सध्या चर्चा रंगली आहे ती नोरा आणि हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेज यांच्या फॅशन फेसऑफची. नुकतंच नोराने डान्सिंग रियॅलिटी शोमध्ये ऑरेंज रंगाचा ड्रेस परिधान केला होता. पण हा ड्रेस आणि जेनिफर लोपेजने घातलेल्या ड्रेसमध्ये काहीच अंतर नसून दोन्हीही सेम आहेत.
2019 मध्ये हॉलीवूड अभिनेत्री जेनिफर लोपेजने (Jennifer Lopez) न्यूयॉर्कच्या एका इव्हेंटमध्ये ऑऱेंज रंगाचा ऑफशोल्डर ड्रेस घातला होता.
नोरानेही हुबेहूब सेम ड्रेस घातला आहे. हा ड्रेस शालीनी नाथनीने स्टाईल केला होता.
नोराने या ड्रेससोबत पाढंऱ्या रंगाचे हिल्स आणि पांढऱ्या रंगाचे कानातले घातले आहेत.
नोरा एक ग्लोबल सिटीझन असून तिचा जन्म मोरोक्कोत झाला होता. तर तिच बालपन टोरोंटोत गेलं. ती स्वत:ला दिलसे हिंदूस्तानी समजते.
नोरा फतेहीचे अनेक डान्स परफॉर्मन्स हिट ठरतात तिचं दिलबर, साकी साकी, कमरिया, नाच मेरी रानी आणि छोड़ देंगे या गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळाला होता.
नोरा तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते नोरोचे हटके लुक्स पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.