NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Jai Jai Swami Samarth : भक्तांना पाहायला मिळणार स्वामी समर्थांच्या मुलाची कथा; प्रसिद्ध अभिनेता साकारणार स्वामीसुत

Jai Jai Swami Samarth : भक्तांना पाहायला मिळणार स्वामी समर्थांच्या मुलाची कथा; प्रसिद्ध अभिनेता साकारणार स्वामीसुत

स्वामींचा प्रिय सुत, स्वामींनी ज्यांना आपले पुत्र मानले म्हणजेच हरिभाऊ तावडे ऊर्फ स्वामीसुत. स्वामींची कृपा लाभलेले आणि त्यांचे लाडके स्वामीसुत हे विलक्षण विभूतिमत्व होते. याच स्वामीसुतांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता साकारणार आहे.

111

जय जय स्वामी समर्थ ही मालिका प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका आहे. मालिकेला आजवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे.

211

स्वामींच्या भूमिकेत असलेला अभिनेता अक्षय मुडावडकरला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. जय जय स्वामी समर्थ मालिकेत आता नवी गोष्ट सुरु होणार आहे.

311

मालिकेत आता स्वामी समर्थांच्या मुलाची एंट्री होणार आहे. पहिल्यांदा स्वामींच्या मुलाची कहाणी प्रेक्षकांना या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

411

स्वामी समर्थ यांच्या दिव्यतेचा अनुभव सगळ्यांनी प्रत्यक्षात अनुभवले असे नाही. पण, मालिकेत स्वामीसुत पर्वाचा आरंभ होणार आहे.

511

स्वामींच्या मुलाची म्हणजेच स्वामीसुत यांच्या भूमिकेत अभिनेता विकास पाटील दिसणार आहे.

611

भूमिकेविषयी बोलताना विकास म्हणाला, "हे खूप महत्वाचे पात्र आहे. कारण स्वामींनी त्यांना आपला मानसपुत्र मानले होता.

711

"तुम्हाला मालिकेत बघताना कळेलच कसा त्यांना स्वामींवर विश्वास नव्हता, पण हळूहळू स्वामींनी त्यांना आपल्या जवळ घेतलं,आणि कश्याप्रकारे त्यांचे आयुष्य बदलून गेलं".

811

"मी खुपचं उत्सुक आहे या भूमिकेबद्दल कारण मी स्वतः स्वामी भक्त आहे, आणि मला इतकं महत्वाचं पात्र करण्याची संधी मिळाली आहे हीच मी भाग्याची गोष्ट मानतो आणि त्यासाठी स्वामींनी माझी निवड केली यासाठी खूपच खुश आहे".

911

"खूप आव्हानात्मक आहे आधीचे हरिभाऊ आणि त्यानंतर स्वामीसुत... खूप साऱ्या गोष्टींचा विचार मी केला काळ वेगळा आहे त्यामुळे भाषेचा लहेजा, पोशाख असेल... खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर, प्रेक्षक यावेळेस देखील भरभरून प्रेम करतील अशी आशा आहे मला".

1011

विकास पाटील नुकताच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतही झळकला होता.

1111

त्याचप्रमाणे संत गजानन शेगावीचे या मालिकेतही विकासनं महत्त्वाची भूमिका साकारली होती.

  • FIRST PUBLISHED :