अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शित नवा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचं नाव मात्र सुबोध अद्याप गुलदस्त्यात ठेवल आहे.
सुबोध गेली अनेक दिवस या सिनेमाच्या संहितेवर काम करत होता. दिग्दर्शक म्हणून सुबोधचा हा एक वेगळा प्रयत्न असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली असून सातारा जिल्ह्यातील सुबोधच्या आवडत्या गावी म्हणजे वाई येथे सिनेमाचं शुटींग सुरू आहे.
'आवडत्या गावात शूटिंग असणं या सारखा आनंद नाही', असं म्हणतं सुबोधनं फोटो शेअर केला आहे.
वाईतल्या फार सुंदर लोकेशनचे काही फोटो सुबोधनं शेअर केले आहेत.
सिनेमातील त्याचा हा फोटो 'कवडसे' असं कॅप्शन देत सुबोधनं हा फोटो शेअर केलाय.
मराठीतील प्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी सिनेमाचं लेखन केलं आहे. तर नितीन वैद्य यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.
नव्या सिनेमासाठी सुबोधनं प्रचंड मेहनत घेतली असून तो फार उत्सुक आहे.