अभिनेता प्रसाद ओक हा पत्नीसह सध्या लंडन दौऱ्यावर असल्याचं समोर आलं आहे. प्रसादने लंडनमध्ये काढलेले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यामध्ये लंडनमधील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देत या जोडीने फिरायचा मनमुराद आनंद लुटल्याचं समोर आलं आहे.
प्रसादने सोशल मीडियावर बायकोसह लंडनमध्ये भेट दिलेल्या अनेक ठिकाणचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
त्यावर मात्र एका चाहत्याने केलेली अजब मागणी सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
एका युजरने असं लिहिलं आहे, “येताना आपला कोहिनूर हिरा व भवानी तलवार तेवढी घेऊन या…”
प्रसाद आणि मंजिरी यांच्या जोडीबद्दल सांगायचं झालं तर हे दोघेही नेहमीच एकमेकांसोबत खूप चांगला वेळ सोबत घालवताना दिसतात. एवढंच नव्हे तर दोघेही एकत्र एकमेकांना कामात मदत करतात आणि एकमेकांसोबत धमाल करताना दिसतात.
मंजिरी ही चंद्रमुखी या प्रोजेक्टमध्ये प्रसादसोबत हिरीरीने काम करत होती. चाहते नेहमीच त्यांच्या या जोडीला पसंत करत आले आहेत.