अभिषेक बच्चन ट्विटरवर सतत सक्रिय असतो. कोणी त्याच्याबद्दल किंवा त्याच्या कुटुंबाबद्दल काही चांगलं-वाईट बोललं तर तो लगेच प्रतिसाद देतो. पुन्हा एकदा तेच झालं आहे.
मणि रत्नम दिग्दर्शित पोन्नियीन सेलवन या चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
अभिषेकने हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर रिव्ह्यू शेअर केला आहे. मात्र नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
अभिषेकने बायको ऐश्वर्याचं कौतुक करत ट्वीट केलं होतं.
'पोन्नियीन सेलवन २ हा चित्रपट उत्कृष्ट आहे. माझ्याकडे या चित्रपटाविषयी बोलण्यासाठी शब्द नाहीत. संपूर्ण टीमने छान काम केले आहे. मला माझ्या पत्नीचा अभिमान वाटतो. मला असे वाटते की हे तिचे आतापर्यंतचे सर्वात उत्तम काम आहे' असं त्याने म्हटलं आहे.
या आशयाचे ट्वीट अभिषेकने केले होते. ते पाहून एका चाहत्यानं त्याला सल्ला दिला. त्यावर अभिषेकने संताप व्यक्त केला आहे.
एका नेटकऱ्याने 'तुला ऐश्वर्यचा अभिमान असायलाच हवा. तिला आता आणखी चित्रपट साइन करुन दे आणि तू स्वत: आराध्याला सांभाळ' असे म्हणत अभिषेकला सुनावले.
त्यावर अभिषेकही शांत बसला नाही. त्याने ट्रोलरला उत्तर देत म्हटले की, 'साइन करु देऊ? सर, तिला कोणत्याही गोष्टीसाठी माझ्या परवानगीची गरज लागत नाही. खास करुन ज्या गोष्टीवर तिचे प्रेम आहे त्या गोष्टीसाठी तर मुळीच नाही.'
अभिषेकने केलेल्या या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा आहे.