अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची सून सध्या चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ही जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरते.
पण यांच्यामध्ये आता काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू आहेत.
अलीकडेच मुंबईत आयोजित नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन समारंभात ऐश्वर्या आपली मुलगी आराध्यासोबत पोहोचली होती आणि तिच्या सुंदर स्टाईलमुळे ती चर्चेत आली होती. पण यावेळी अभिषेक या दोघींसोबत नव्हता.
अभिषेकच्या अनुपस्थितीने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. इतकेच नाहीतर अनेकांनी थेट यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु आहे.
पण आता अभिषेकने यावर मौन सोडत घटस्फोटाच्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.
एका चाहत्याने ऐश्वर्या आणि आराध्याचा एक फोटो शेअर करत 'माझे आवडते लोक' असे लिहिले अभिषेक बच्चनला टॅग देखील केले होते. या चाहत्याच्या ट्विटला उत्तर देताना, 'मी टू' असे लिहीत घटस्फोटाच्या चर्चा थांबवल्या आहेत.
ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाला १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांनी 20 एप्रिल 2007 रोजी लग्नगाठ बांधली होती. मुलगी आराध्याचा जन्म 2011 मध्ये झाला.
पण आता यांच्यात सर्वकाही आलबेल असल्याने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.