सुबोध भावेने बालगंधर्वांची भूमिका अजरामर करून ठेवली आहे. आता त्यांच्यानंतर मराठीतील प्रसिद्ध अभिनेता ही भूमिका साकारणार आहे.
कलर्स मराठीवर सुरू असलेली योगयोगेश्वर जय शंकर ही मालिका लोकप्रिय आहे. यात सद्गुरु श्री शंकर महाराज यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवला जात आहे.
आता या मालिकेला नवीन वळण लागणार आहे. ते म्हणजे मालिकेत बालगंधर्व दाखवले जाणार आहेत.
मालिकेत बालगंधर्वांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता अभिजित केळकर साकारणार आहे.
नुकतेच अभिजीतचे या रूपातील फोटो समोर आले आहेत.
अभिजीतने या आधी सुबोध भावेंच्या बालगंधर्व चित्रपटात त्यांच्या मित्राची भूमिका साकारली होती.
आता या मालिकेत तो बालगंधर्वांच्या भूमिकेत दिसणार आहे.
योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत आता बालगंधर्वांच्या एंट्रीने कोणतं वळण येणार ते पाहणं महत्वाचं आहे.