NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Abhidnya Bhave: लग्नाच्या पहिल्या वर्षातच नवऱ्याला कॅन्सर; एकमेकांना खंबीर साथ देत पूर्ण केली सुखी संसाराची इतकी वर्षे

Abhidnya Bhave: लग्नाच्या पहिल्या वर्षातच नवऱ्याला कॅन्सर; एकमेकांना खंबीर साथ देत पूर्ण केली सुखी संसाराची इतकी वर्षे

अभिनेत्री अभिज्ञा भावे एक गुणी अभिनेत्री आहे. प्रेक्षकांना तिचा बिनधास्त अंदाज प्रचंड आवडतो. अभिज्ञाने पती मेहुल पै सोबत लग्नगाठ बांधली. पण त्यानंतर तिच्या आयुष्यात एक वाईट काळ आला. मेहुलला कॅन्सरचं निदान झालं. पण एकमेकांना साथ देत दोघे आज सुखी संसार करत आहेत. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घ्या काय आहे या दोघांच्या सुखी संसाराचं सिक्रेट....

18

अभिज्ञाने 06 जानेवारी 2021 मध्ये मेहुल पैसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला बरीच मित्रमंडळी आणि मराठीतील अनेक कलाकार सुद्धा हजर होते.

28

अभिज्ञाच्या वेडिंग लुक, आणि एकूणच लग्नाची सुद्धा खूप चर्चा झाली होती. आज दोघे सुखी संसाराची दोन वर्षे पूर्ण करत आहेत.

38

मात्र लग्नाच्या काही दिवसांमध्येच तिने एका पोस्टमधून तिच्या नवऱ्याला कॅन्सरचं निदान झाल्याची बातमी शेअर केली. या बातमीनंतर तिला अनेकांनी खूप आधार दिला. तिच्या चाहत्यांनी सुद्धा तिला खंबीर आधार दिला होता.

48

आता मेहुल पूर्णपणे बरा होऊन कॅन्सरमुक्त झाला आहे. या गोष्टीविषयी सांगताना अभिज्ञा म्हणाली होती कि, 'मी आणि मेहुलने या गोष्टीकडे खूप सकारत्मकतेने पाहायचं ठरवलं. मला असं वाटत की कदाचित चांगला काळ नाही तर वाईट काळ एका जोडप्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो.'

58

ती पुढे म्हणाली होती कि, 'ही वेळ एका परीक्षेसारखी असते. त्यावेळी एकतर तुम्ही खूप जवळ येता, तुमचं नातं अधिक घट्ट होतं किंवा तुम्ही पूर्णपणे लांब होऊन तुमचं नातं तुटत.'

68

अभिज्ञा या कठीण काळाविषयी सांगते कि, 'मी आणि मेहुल या कठीण काळामुळे खूप जवळ आलो. आमचं नातं अधिक स्ट्रॉंग झालं आहे. अशा काळात इमोशनली माणूस खूप नाजूक अवस्थेत असतो तेव्हा फक्त त्याला सपोर्ट करणं महत्त्वाचं आहे.' अशा भावना तिने व्यक्त केल्या होत्या.

78

अभिज्ञा आणि मेहूल दोघेही घटस्फोटित आहेत. ते दोघे कॉलेजपासून एकमेकांचे मित्र आहेत.

88

अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी दोन वर्षांपुर्वी लग्नगाठ बांधली. आज दोघेही सुखी संसार करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :