कालपासून सगळीकडे गणेशचतुर्थीचा उत्सव सुरू झाला आहे. अनेक सेलिब्रीटींच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. अभिज्ञा भावेच्या घरीही बाप्पा आले आहेत. पण तिने आगळी वेगळी सजावट केली आहे.
अभिज्ञाने विठ्ठलरुपी गणेशा घरी आणला आहे. त्याने साऱ्याचंच लक्ष वेधलं आहे.
याशिवाय आरासही विठ्ठलरुपी केली आहे. जी फारच आकर्षक दिसत आहे.
अभिज्ञा पती मेहूल पैसोबत गणेशाची पूजा करताना दिसली. सुंदर ऑफ व्हाइट साडीत ती फारच सुंदर दिसत होती.
हाती सुदर्शन चक्र असलेल्या बाप्पाची आकर्षक मुर्ती तिने घरी आणली आहे.
अभिज्ञाचं यावर्षी सुरूवातीला लग्नं झालं होतं. मित्र महूल पैसेबत तिने विवाह केला होता.
आपल्या आईबाबांसोबत अभिज्ञा अगदी आनंदात दिसत आहे.