मराठीमध्ये अनेक कलाकार भावंडांची जोडी लोकप्रिय आहे. एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या लोकप्रिय भावंडांबद्दल अनेकदा प्रेक्षकांना कल्पना नसते. अशीच एक भावाबहिणीची जोडी मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहे ती म्हणजे अभिषेक आणि अमृता देशमुख.
अभिषेक देशमुख अर्थात ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यशची खऱ्या आयुष्यातली सख्खी बहीणसुद्धा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अमृता देशमुख आहे.
अमृताला सगळ्या प्रेक्षकांनी फ्रेशर्स मालिकेत पाहिलं आहे. या मालिकेतील पात्राने तिला घराघरात ओळख दिली.
सध्या ही अभिनेत्री एक RJ असून भल्याभल्यांची बोलती ती बंद करताना दिसून येते.
पुण्याची टॉकरवडी या नावाने ती सध्या रेडिओ जॉकीचं काम करत असून त्यात सुद्धा ती एकदम तरबेज झाल्याचं दिसून येत आहे. याशिवाय ही अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावरील रील्समुळे सुद्धा ओळखली जाते.
अभिषेक आणि अमृता यांचं नातं खूप स्पेशल असल्याचं अनेक पोस्टमधून कळू शकतं.
दोघेही एकमेकांबद्दल अनेकदा भन्नाट गोष्टी शेअर करताना दिसतात. या बहीण भावाच्या जोडीने काही भन्नाट रील्स सुद्धा केले आहेत.
अभिषेक आणि अमृता दोघेही पुण्याचे आहेत आणि सध्या त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होताना दिसत आहेत.
अभिषेक देशमुखची पत्नी सुद्धा अभिनेत्री असून तिचं नाव कृतिका देव आहे.