'आई कुठे काय करते' मालिकेत आता अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची लगबग पाहायला मिळतोय. मालिकेत अरुंधती-आशुतोषच्या आयुष्यातील तो खास क्षण अवघ्या काही वेळेवर येऊन ठेपला आहे.
लवकरच मालिकेत अरुंधती आणि आशुतोषचा लग्नसोहळा दाखवण्यात येणार आहे. पण अरुंधतीच्या लग्नामुळे कांचन मात्र नाराज आहे. तिने अरुंधतीला हळद लावायला देखील नकार दिला.
अनिरुद्धचे सगळे डाव फसले असून तो आता तिच्या लग्नामध्ये चांगलाच बावचळला आहे. अरुंधतीला दुखावण्यासाठी तो सतत काहीतरी करत आहे.
नुकत्याच समोर आलेल्या अपडेट मध्ये अनिरुद्ध अरुंधतीला म्हणतो कि, 'आता गेलीस कि परत येऊ नकोस.'
तो पुढे सगळ्यांना संबोधून म्हणतो कि, 'तुम्ही सगळे तिला परत बोलावणं बंद करा. ही तर नेहमी तयारच असते आला फोन कि निघाली.'
अनिरुद्धचं असं वाईट बोलणं ऐकून सगळ्यांनाच त्याचा राग येतो.
त्यावर प्रतिक्रिया देताना कांचन चिडून म्हणते कि, 'बास आता कंटाळा आलाय मला याचा. ज्यांना या घरात राहायचं असेल त्यांनी राहा आणि ज्यांना सोडून जायचंय ते खुशाल जा.'
आता एकीकडे अरुंधती नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे पण दुसरीकडे तिला मात्र अनेकांची नाराजी झेलावी लागतेय. आता देशमुख कुटुंबीय अनिरुद्धचं स्वागत आपल्या कुटुंबात कसं करतात ते पाहणं महत्वाचं आहे.