सुंदरा मनामध्ये भरली, आई कुठे काय करते सारख्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राधा सागर लवकरच आई होणार आहे.
राधा सागरनं काही दिवसांआधीच बेबी बंपसह फोटो शेअर करत ती प्रेग्नंट असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली.
राधा आणि तिचा नवरा सागर यांचं हे पहिलं अपत्य असणार आहे. असं असलं तरी दोघांनी डोहाळे जेवण मात्र दोन वेळा केलं आहे.
जून महिन्यात राधाचं एक डोहाळे जेवण पार पडलं होतं. त्यानंतर एका महिन्यातच तिचं दुसरं डोहाळे जेवण पार पडलं आहे.
राधाच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आलेत. यावेळी डोहाळे जेवणाच्या साग्रसंगीत सगळ्या विधी करण्यात आल्या.
काही दिवसात आई होणार असलेल्या राधाच्या चेहऱ्यावरील मॉमी ग्लो कुठेच लपू शकला नाही. राधाच्या क्यूट फोटोंना चाहत्यांनी पसंती दिली आहे.