आई कुठे काय करते मालिकेतून अरुंधतीच्या भूमिकेने मधुराणी गोखके प्रभुलकर साकारताना दिसते. या मालिकेने ती महाराष्ट्राच्या घरारघरात पोहोचली.
आई कुठे काय करते या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्या अगोदर तिने आणखी काही चित्रपट मालिकेतून काम केले होते.
मधुराणीचा जन्म भुसावळचा पण तिचे शिक्षण पुण्यातच झाले. मधुराणीच्या आई देखील एक लोकप्रिय कलाकार आहेत.
मधुराणीच्या आईचे नाव विजया गोखले आहे. त्या शास्त्रीय गायिका आहेत. त्यामुळे घरातूनच तिला गायनाच्या कलेचा वारसा लाभला.
आईमुळेच मधुराणी आणि अमृता या त्यांच्या दोन्ही मुलींना गायनाची आवड निर्माण झाली होती.
मधुराणीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले ते वयाच्या सोळाव्या वर्षी. सी सॉ या नाटकाचे लेखन व निर्मिती केली होती.
मधुराणीच्या आई विजया गोखले या शास्त्रीय गायिका आहेत. विजया गोखले यांनी शास्त्रीय गाण्याच्या अनेक मैफिली रंगवल्या आहेत. मधल्या काळात त्या गायन क्षेत्रापासून दूर राहिलेल्या दिसल्या.
चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमातून मुशाफिरी करत असताना मधुराणीने गायन क्षेत्रातही हळूहळू जम बसवला. अनेकदा आई कुठे काय करते या मालिकेमुळे तिला गाण्याची संधी मिळालेली आहे.