आजकाल आई कुठे काय करते फेम अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
मधुराणीचा खऱ्या आयुष्यात घटस्फोट होणार अशी चर्चा होती पण त्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. पण आता मधुराणीने घटस्फोटाबद्दल आणि लग्न संस्थेबद्दल केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.
मधुराणी प्रभुलकरने नुकतंच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यादरम्यान तिने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
मधुराणीला यावेळी 'बाईपणाची सध्या जास्त होतं आणि पुरुष कुठेतरी दबला जातो असं वाटतंय का? असा प्रश्न विचारला. तयावे उत्तर देत मधुराणी म्हणाली, 'काय हरकत आहे मग. स्त्रियांनीच दबून राहायचं का नेहमी? पुरुषांना पण जरा अनुभव येऊ की या गोष्टीचा.''
ती पुढे म्हणाली, 'पुरुषांनी दबलंच पाहिजे आता. त्याशिवाय काही पर्याय नाही, इतके वर्ष तुम्हीच पुढे होतात. आता पुरुषांनी स्वतःत बदल नाही केले तर स्रिया विचारणार नाहीत तुम्हाला.'
याबद्दलच बोलताना मधुराणी पुढे म्हणाली, 'स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आता जर तुम्ही स्वतःत बदल नाही केले, तिला आहे तसं स्वीकारलं नाही, तर लग्नसंस्था मोडकळीस येईल. '
तसंच ती म्हणाली, 'असं झालं तरी काही हरकत नाही. लग्नसंस्था मोडली तरी चालेल कारण त्याशिवाय नवीन संस्था निर्माण होणार नाही.' असं भाष्य मधुराणीने केलं आहे.
मधुराणी प्रभुलकरने काही दिवसांपूर्वी ‘मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड प्रायव्हेट लिमिटेड’ यां संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला त्यानंतर अभिनेत्रीच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या. पण प्रमोद यांनी आता असं काही होणार नसल्याचं सांगितलं आहे.