आई कुठे काय करते 'ही' मालिका चांगलीच गाजली. अरुंधती सोबतच यातील प्रत्येक पात्र तेवढंच लोकप्रिय झालं. यापैकीच गाजलेलं एक पात्र म्हणजे गौरी. आता यशची बायको आणि अरुंधतीची होणारी सून नव्या मालिकेत दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वी मालिकेत गौरी आणि यश विषयी मोठी घडामोड घडली होती.
यशच्या आयुष्यातून गौरीने एक्झिट घेतली होती. ती तिच्या आई बाबांकडे अमेरिकेला निघून गेली होती.
मालिकेत गौरी हे पात्र अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिने साकारलं होतं.
आता गौरी नव्या मालिकेत दिसणार आहे.
सन मराठीवर नव्याने सुरु होणाऱ्या 'प्रेमास रंग यावे' या मालिकेत गौरी कुलकर्णी झळकणार आहे.
तिच्या भूमिकेविषयी अजून माहिती समोर आली नसली तरी तिला पाहण्यासाठी चाहते मात्र प्रचंड उत्सुक आहेत.
आता गौरी नव्या मालिकेत दिसणार म्हटल्यावर आई कुठे काय करते मधून ही गौरी कायमची एक्झिट घेणार कि तिच्या जागी नवी अभिनेत्री पाहायला मिळणार याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.