आई कुठे काय करते मालिकेती अरुंधतीच्या नणंदेची भुमिका म्हणजेच विशाखाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं.
आई वडिलांची लाडाची लेक, लाडकी आत्या आणि प्रेमळ नणंद अभिनेत्री पुनम चांदोरकर हिने उत्तम साकारली आहे.
अभिनेत्री पुनम चांदोरकर तिच्या नव्या प्रोजेक्टमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भुमिकेत दिसणार आहे.
पुनमनं खाकी वर्दी परिधान केलेले फोटो शेअर करत लिहिलंय, "लहानपणापासूनच बाबांना, काकांना ,भावांना या खाकी वर्दी (पोलीस युनिफॉर्म) मध्ये बघितलं आहे. त्या वर्दीचा मान ठेवताना बघितलं. प्रामाणिकपणे काम करताना बघितल आहे".
"म्हणून जेव्हा जेव्हा शूटिंगच्या वेळेला ही खाकी वर्दी अंगावर चढवताना खरंच खूप अभिमान वाटतो. आनंद होतो".
"लहानपणी, कॉलेजमध्ये असताना त्यांना बघून एकदा तरी ती खाकी वर्दी अंगावर चढवावी असं वाटायचं आणि खरंच या कला क्षेत्रामुळे ते स्वप्न पूर्ण झालं".