आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंग गवळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अनेक फोटो आणि त्यांचे इतक्या वर्षांचे अनुभव ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.
पन्नाशी पार केलेले मिलिंद गवळी आजही फिट अँड फाइन आहेत. मिलिंग गवळी यांची खासियत म्हणजे नव्या पिढीप्रमाणे बदलत आहेत.
सोशल मीडियावर ते सक्रीय आहेतच पण फॅशन विश्वातही ते तितकेच सक्रीय आहेत. अनेक कार्यक्रमांसाठी मिलिंद वेगळ्या आऊटफिटमध्ये दिसतात.
नुकतीच त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी पैठणीचा छान कुर्ता घातला होता. हा कुर्ता घालून ते त्याच्या प्रेमातच पडलेत.
यावर त्यांनी छान पोस्ट शेअर केली. त्यांनी म्हटलंय, पैठणी साडीचा इतका छान कुर्ता होऊ शकतो असं मला कधीच वाटलं नव्हतं नवीन यास हँडल लावून यांनी डिझाईन केलेला हा कोणता घालून खूपच भारी वाटलं
मिलिंद पुढे म्हणाले, खरंच अशाही साडीचा कुर्ता होऊ शकतो हे जर मला आधी माहिती असतं तर बरं झालं असतं.
माझ्या आईकडे हजारो साड्या होत्या, त्या साड्यां पैकी काही साड्यांचा इतका सुंदर कुर्ता झाला असता!
मला असं वाटतं हे आधी कळलं असतं तर मी "कुडता पायजमा " किंवा " कुर्ता धोतर "ही माझी स्टाईलच केली असती, असं मिलिंद गवळी म्हणालेत.
मिलिंद यांचा हा लुक त्यांच्या चाहत्यांदेखील प्रचंड आवडला आहे.