प्रसिद्ध गायक संगीतकार ए.आर.रहमान यांनी अनेक वर्ष भारतीय संगीतात मोलाचं योगदान दिलं आहे.
या सूरांच्या बादशाहचा कॅनडामध्ये मोठा सन्मान करण्यात आला आहे.
कॅनडाच्या मरखम शहरातील एका रस्त्याला ए.आर.रहमान यांचं नाव देण्यात आलं आहे.
कॅनडातील रस्त्याला रहमान यांचं नाव देण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी नोव्हेंबर 2013मघ्ये कॅनडातील मरखम शहरातील एका रस्त्याला रहमान यांचं नवं देण्यात आलं होतं.
ए.आर. रहमान यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. कॅनडातील त्या रस्त्यावर आपल्या नावाची पाटी पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
या प्रसंगी ए.आर.रहमान यांनी कॅनडाच्या महापौरांचे आभार मानले आहेत. तिथे त्यांनी आपल्या भावना ही व्यक्त केल्यात.
ए.आर. रहमान यांनी कॅनडाच्या महापौरांबरोबरचा फोटो शेअर करत, 'मरखम शहर, फ्रँक स्कारपिटी आणि कॅनडाच्या नागरिकांनी माझा सन्मान केला यासाठी मी त्यांचा आभारी आहे', असं म्हटलं आहे.
ए. आर. रहमान यांना भारताबरोबरच अनेक राज्यांमध्ये अनेक अवॉर्ड देण्यात आलेत.
ए.आर.रहमान दिग्दर्शित मस्क हा पहिला सिनेमा लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
गायक सध्या अभिनेता चियान विक्रम यांच्या कोब्रा या सिनेमाच्या कामात बिझी आहे. तसंच मणिरत्न या सिनेमालाही ए.आर. रहमान संगीत देणार आहेत.