2019मध्ये रिलीज झालेला थ्री इडियट्स हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला. 2012मध्ये थ्री इडियट्सचा Nanban नावानं साऊथमध्ये रिमेक करण्यात आला. यात अभिनेता थलापति विजयनं प्रमुख भूमिका साकारली होती.
2018मध्ये आलेला आयुष्यमान खुरानाचा अंधाधुद सिनेमा. हा सिनेमा पहिल्यांदा तेलुगू मध्ये Maestro नावानं आणि मल्याळममध्ये Shramam नावानं रिमेक करण्यात आला.
विश्वास बसणार नाही पण मुन्नाभाई एमबीबीएस देखील साऊथमध्ये कॉपी करण्यात आलाय. शंकर दादा एमबीबीएस नावानं सिनेमाचा रिमेक करण्यात आलाय ज्यात अभिनेते चिरंजीवी प्रमुख भूमिकेत आहेत. तमिळ आणि कन्नड अशा दोन्ही भाषेत सिनेमा प्रदर्शित करण्यात आला.
अनुपम खेर आणि नसीरुद्दीन शाह यांचा अ वेन्स्डे हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर हिट झाला. सिनेमाचा साऊथमध्ये Eenadu नावानं रिमेक करण्यात आला. या अभिनेता व्यंकटेश आणि कमल हसन यांनी काम केलंय.
अभिनेता इमरान खान, वीर दास कुणाल रॉय कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला डेल्ही बेली हा सिनेमा 2011मध्ये रिलीज झाला. त्यानंतर 2013मध्ये डेल्ही बेली तमिळ भाषेत settai नावानं तयार करण्यात आला.