NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राइम / Crime News: मुंबईत प्रियकराकडून सरस्वती वैद्यच्या शरीराचे तुकडे, कुकरमध्ये शिजवत मिक्सरमध्ये फिरवलं मांस

Crime News: मुंबईत प्रियकराकडून सरस्वती वैद्यच्या शरीराचे तुकडे, कुकरमध्ये शिजवत मिक्सरमध्ये फिरवलं मांस

राजा मयाल, प्रतिनिधी - आरोपी मयत महिलेच्या मृतदेहाची तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवायचा आणि त्यानंतर तो ते मिक्सरमध्ये बारीक करत फेकून द्यायचा, अशी माहिती समोर आली आहे. त्याने सोसायटीच्या मागील बाजूच्या गटारातही मृतदेहाचे काही तुकडे फेकल्याची माहिती मिळत आहे.

17

सध्या आरोपीला पोलिसांनी अटक करुन घरातील हत्येसाठी वापरण्यात आलेलं सर्व साहित्य जप्त केलं आहे.

27

मीरा भाईंदर शहर हत्येच्या या घटनेनं पूर्णपणे हादरुन गेलं आहे. मीरा भाईंदरच्या उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदिप या सोसायटीत ही क्रूर घटना घडली

37

या सदनिकेत मनोज साने वय 56 आणि त्याची रुम पार्टनर मयत सरस्वती वैद्य वय 32 हे दोघे राहत होते. मागच्या तीन वर्षांपासून हे जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येथे राहत होतं.

47

या इमारतीत राहणाऱ्या शेजारच्या लोकांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. नयानगर पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर या भयानक घटनेचा पर्दाफाश झाला.

57

सुञांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मनोज सानेला मयत सरस्वती वैद्यचं कुठेतरी अफेअर सुरु असल्याचा संशय येत होता. त्यामुळे मागील 3 ते 4 दिवासांपासून या दोघांचं भांडण सुरु होतं.

67

मयत सरस्वती वैद्य हिने दोन ते तीन दिवसांपूर्वीच विष पित आपलं जीवन संपवलं होतं. तिच्या आत्महत्येस पोलीस आपल्याला कारणीभूत ठरवतील या भितीने त्याने मयत सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची शक्कल लढवली.

77

मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी तो आपल्या बाईकचा वापर करायचा. पोलिसांनी राञी उशिरा हत्येसाठी वापरण्यात आलेलं घरातील सर्व सामान तसंच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात येणारी बाईकही जप्त केली आहे.

  • FIRST PUBLISHED :