NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / कोरोना / कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वात प्रभावी मास्क कुठला? शास्त्रज्ञांनी शोधलं उत्तर

कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वात प्रभावी मास्क कुठला? शास्त्रज्ञांनी शोधलं उत्तर

कोरोनापासून (Corona) बचाव करण्यासाठी सर्वात प्रभावी मास्क (Effective Mask) कुठला, याचं उत्तर वैज्ञानिकांनी (Scientists) शोधलं आहे. सध्या वेगवेगळे मास्क बाजारात उपलब्ध आहेत. मात्र रोजच्या वापरासाठी सर्जिकल मास्कच (Surgical Mask) सर्वोत्तम सिद्ध झाल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

16

बांग्लादेशमधील ढाक्याच्या येल विद्यापीठात मास्कच्या परिणामकारकतेवर संशोधन करण्यात आलं. याबाबतचा अभ्यास नुकतान वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

26

हा अभ्यास ‘गोल्ड स्टँडर्ट’चा असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. सर्जिकल मास्क हा कापडाच्या मास्कपेक्षा अधिक परिणामकारक असल्याचं या अभ्यासातून दिसून आलं आहे.

36

या मास्कमुळे श्वास घेण्यास त्रास होत नाही. त्यामुळे वारंवार हा मास्क चेहऱ्यावरून काढला जाण्याची शक्यता कमी होत असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

46

बांग्लादेशमधील 600 गावांमध्ये संशोधन करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या गावांतील 3 लाख 42 हजार नागरिकांवर प्रयोग केल्यानंतर शास्त्रज्ञांनी सर्जिकल मास्क सर्वात प्रभावी असल्याचं म्हटलं आहे.

56

नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2021 या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला.

66

या निष्कर्षावर अद्याप वैज्ञानिकांनी अंतिम मोहोर उमटवणं बाकी आहे. याचा ‘पिअर रिव्ह्यू’ झाल्यानंतरच हा अभ्यास सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित केला जाणार आहे.

  • FIRST PUBLISHED :