जगभरात मोठ्या प्रमाणात कंपन्या नोकर कपात करत आहेत. आर्थिक मंदीचे संकट आणि त्यासोबत अनेक अडचणींना तोंड देत कंपनी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात करत आहेत.
अनेक बड्या कंपन्यांपाठोपाठ आता नोकरी शोधून देणाऱ्या सर्वात मोठ्या कंपनीमध्ये मोठी नोकर कपात झाली आहे. कर्मचाऱ्यांना काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
लोकांना नोकरी शोधून देणाऱ्या लिंक्डइन प्लॅटफॉर्ममध्येच 716 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केल्याची माहिती मिळाली आहे.
याआधी फेब्रुवारी महिन्यात कंपनीने काही कर्मचारी कामावरून काढले होते. आता दुसऱ्या फेरीत देखील काही कर्मचारी कामावरून काढलं आहे.
लिंक्डइनमध्ये एकूण 20 हजार कर्मचारी काम करत आहेत. गेल्या 2 तिमाहीमध्ये कंपनी फायद्यात आहे.
कोणतंही नुकसान झालेलं नाही असं असताना देखील लिंक्डइन सारखी मोठी संस्था कर्मचारी कपात का करते अशी चर्चा सुरू झाली आहे.
एका रात्रीत इमेल करून याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती दिली आहे. तर चीनमधील ऑफिस बंद करणार असल्याचीही चर्चा आहे.