भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतच्या कारचा आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतवर सध्या डेहराडूनमध्ये उपचार केले जात आहेत.
ऋषभ पंत त्याच्या मर्सिडीज एएमजी जीएलई ४३ ४ मेटिक कूपमधून प्रवास करत होता. रुर्किच्या नार्सन बॉर्डरवर रेलिंगला कार धडकून पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी धाव घेत पंतला गाडीतून बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं.
ऋषभ पंतने २०१९ मध्ये मर्सिडीज जीएलसी 220 डी कार खरेदी केली होती.नेहमीच तो या कारमधून फिरताना दिसत असे.
कारमध्ये अनेक सेफ्टी फिचर्स होते. ८० किमी प्रति तास वेगापेक्षा जास्त वेग झाल्यास १ बीप आणि १२० किमी प्रति तास वेगापेक्षा जास्त वेग झाल्यास सतत बीप वाजत होते. कारमध्ये ६ एअरबॅग्जही होत्या.
याशिवाय टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, सीट बेल्ट वॉर्निंग, अँटि लॉक ब्रेकिंग सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्यूशन, ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्रॅम, हिल होल्ड कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम, हिल डिसेंट कंट्रोल यांसारखी फीचर्स आहेत.
मर्सिडीजकडून जेव्हा या मॉडेलचं उत्पादन बंद कऱण्यात आलं तेव्हा गाडीची एक्स शोरूम किंमत ९९.२० लाख रुपये इतकी होती. तर ऑन रोड किंमत एक कोटी रुपयांहून अधिक होती.
५ सीटर कारचे इंजिन २९९६ सीसी, व्ही शेप ४ सिलिंडर, ४ व्हॉल्व, सिलिंडर, डीओएचसी पेट्रोल इंजिन होतं. तर ९ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसोबत ते जोडण्यात आलं होतं.