बालाजी विठ्ठल निरफळ उस्मानाबाद प्रतिनिधी : दुष्काळी भागात शेती करणं म्हणजे महाकठीण आणि त्यातून लाखोंचं उत्पन्न मिळणं म्हणजे स्वप्न किंवा मृगजळचं म्हणायला हवं. पण हे स्वप्न वडील आणि मुलाने सत्यात उतरलं. शेतीला आधुनिकतेची जोड देऊन चक्क वडील आणि मुलाने दुष्काळग्रस्त भागात स्ट्रॉबेरी पिकवली.
दुष्काळग्रस्त व कोरडवाहू ही उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख हळूहळू का होईना पण बदलते आहे. शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात 5 एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचे मळे फुलवले आहेत.
या मधून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न वडील आणि मुलगा काढत आहेत.
सध्या स्ट्रॉबेरीला प्रति किलो साडेचारशे रुपये भाव आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीची शेती शेतकऱ्यांना मालामाल करते असं म्हणायला हरकत नाही.
कळंब तालुक्यातील पाथर्डी येथील शिवाजी साखरे व प्रदीप साखरे या पिता-पुत्रांनी एक एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी ची शेती केली.
यामधून त्यांना दोन लाखापेक्षा अधिक उत्पन्न आलं.
तुळजापूर तालुक्यातील सचिन सूर्यवंशी व वैभव सूर्यवंशी या दोघांनी देखील स्ट्रॉबेरीची शेती करून लाखो रुपये मिळवले
एकंदरीत कोरडवाहू समजल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सध्या स्ट्रॉबेरी ची शेती फायद्यात येताना दिसते आहे.
गेल्या दोन-तीन वर्षात चांगला पाऊस झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीकडे वळताना दिसतो आहे. त्यातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा होताना दिसत आहे.