JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / World Brain Day 2022: तरुणांमध्येही वाढतोय ब्रेन स्ट्रोक; तज्ज्ञांकडून जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

World Brain Day 2022: तरुणांमध्येही वाढतोय ब्रेन स्ट्रोक; तज्ज्ञांकडून जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

ब्रेन स्ट्रोक अचानक होतो आणि 4-5 तासात उपचार न मिळाल्यास शरीराच्या काही भागात अर्धांगवायू होतो. याशिवाय अनेक प्रकरणांमध्ये लोकांचा मृत्यूही होतो. हृदयविकार किंवा मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना पक्षाघाताचा धोका सर्वाधिक असतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 22 जुलै : जगभरातील लोकांना मेंदूच्या आरोग्याविषयी जागरूक करण्यासाठी दरवर्षी 22 जुलै रोजी जागतिक मेंदू दिन साजरा केला जातो. सध्याच्या काळात मेंदूशी संबंधित समस्या खूप वाढल्या आहेत आणि सर्व वयोगटातील लोक मेंदूच्या विकारांना बळी पडत आहेत. स्ट्रोक हा मेंदूशी संबंधित सर्वात मोठा धोका आहे. जेव्हा मेंदूच्या कोणत्याही भागाला रक्तपुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा आवश्यक ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचत नाहीत आणि मेंदूचे नुकसान होते. ब्रेन स्ट्रोक ही एक वैद्यकीय आपत्कालीन स्थिती असते, ज्यावर त्वरित उपचार न केल्यास, शरीराच्या अर्ध्या भागात अर्धांगवायू होतो. अनेक वेळा पक्षाघातामुळे लोकांचा मृत्यू होतो. आज तज्ज्ञांकडून ब्रेन स्ट्रोकची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध याबद्दल माहिती (World Brain Day 2022) घेऊया. तज्ञ काय म्हणतात? सर्वोदय हॉस्पिटल (फरीदाबाद) चे न्यूरोसर्जन डॉ. गौरव केसरी यांच्या मते, स्ट्रोकच्या वेळी हृदय किंवा इतर कोणत्याही अवयवातून गुठळी मेंदूपर्यंत पोहोचते आणि रक्तपुरवठा खंडित होतो. अशा स्थितीत मेंदूच्या पेशी खराब होऊ लागतात आणि त्यामुळे गंभीर स्थिती निर्माण होते. ब्रेन स्ट्रोक अचानक होतो आणि 4-5 तासात उपचार न मिळाल्यास शरीराच्या काही भागात अर्धांगवायू होतो. याशिवाय अनेक प्रकरणांमध्ये लोकांचा मृत्यूही होतो. हृदयविकार किंवा मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना पक्षाघाताचा धोका सर्वाधिक असतो. ब्रेन स्ट्रोक तरुणांनाही होत आहे. यामध्ये तरुणींची संख्या अधिक आहे. ब्रेन स्ट्रोकची लक्षणे काय आहेत? स्ट्रोक दरम्यान, शरीराचा एक भाग अचानक काम करणे थांबवतो. बोलण्यात अडचण येते आणि काही वेळा तोंड वाकडे होते. डोळ्यांसमोर अंधार येतो आणि व्यक्तीची दृष्टी धूसर होते. चक्कर येणे आणि बेशुद्ध पडणे. काही प्रकरणांमध्ये, तीव्र डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास देखील दिसून येतो. हे वाचा -  बेसन वापरून असं करा फेशिअल; घरच्या घरी निखळ-सुंदर होईल चेहऱ्याची त्वचा ब्रेन स्ट्रोकची मुख्य कारणे कोणती? डॉ. गौरव केसरी यांच्या मते, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, रक्तविकार, धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉल आणि तणाव ही पक्षाघाताची प्रमुख कारणे आहेत. गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केल्यानेही पक्षाघाताचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो. हार्मोन थेरपी आणि अधिक स्टिरॉइड्स घेतल्याने स्ट्रोकची प्रकरणे देखील आहेत. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने स्ट्रोकचा धोकाही वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते, गंभीर आजारांसोबत स्ट्रोकचा धोका वाढतो. गर्भधारणेदरम्यान विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण त्या स्थितीत पक्षाघाताचा धोकाही वाढतो. हे वाचा -  तुम्हालाही आहे हाय कोलेस्ट्रॉलची चिंता? ‘या’ 5 तेलांचा स्वयंपाकात करा समावेश ब्रेन स्ट्रोक कसा टाळायचा? धुम्रपान करू नका मधुमेह नियंत्रणात ठेवा उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवा हृदयविकारावर योग्य उपचार करा कोलेस्टेरॉलची पातळी वाढू देऊ नका दारू पिऊ नका स्टिरॉइड्स अजिबात घेऊ नका गर्भनिरोधक गोळ्या घेऊ नका सकस आहार घ्या आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा नियमित आरोग्य तपासणी करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या