JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'मातोश्री'वर हुंदके अन् संताप, 'धनुष्यबाण गोठवल्याची बातमी समजल्यावर उद्धव ठाकरे रडले'

'मातोश्री'वर हुंदके अन् संताप, 'धनुष्यबाण गोठवल्याची बातमी समजल्यावर उद्धव ठाकरे रडले'

‘बाळासाहेब ज्या देव्हारातील देवांची पूजा करायचे त्या देव्हाऱ्यात धनुष्यबाण ठेवलं होतं, त्याची पूजा देखील बाळासाहेब करायचे, ते चिन्ह आज गोठवलं आणि हे सांगताना…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 10 ऑक्टोबर : ‘‘बाळासाहेब ज्या देव्हारातील देवांची पूजा करायचे त्या देव्हाऱ्यात धनुष्यबाण ठेवले होते, त्याची पूजा देखील बाळासाहेब करायचे, ते चिन्ह आज गोठवलं आणि हे सांगताना उद्धव ठाकरे यांचा बांध फुटला. ज्या चिन्हावर तुम्ही मंत्री झालात, निवडून आला, तेच चिन्ह तुम्ही गोठवलं. आज उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आले, असं म्हणत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. शिवसेनेकडून आता प्रबोधन यात्रा सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून सुरू झाली. या यात्रेदरम्यान आयोजित कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी भास्कर जाधव यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर बसलेली मंडळी ही खरी होती तर BKC येथे जमलेली मंडळी गटारी करता जमलेली मंडळी होती.  कौजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधात केशर पिस्ता घालून गोडी वाढवली जाते पण या ४० गद्दारांनी या दुधात मीठ घातलंय. कारण काल रात्री यांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवली, हे कळताच मला रडू आले आणि अतिशय वाईट वाटलं, ज्या चिन्हावर तुम्ही मंत्री झालात निवडून आलात तेच चिन्ह तुम्ही गोठवले आज उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आले, असं म्हणत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ‘बाळासाहेब ज्या देव्हारातील देवांची पूजा करायचे त्या देव्हाऱ्यात धनुष्यबाण ठेवलं होतं, त्याची पूजा देखील बाळासाहेब करायचे, ते चिन्ह आज गोठवलं आणि हे सांगताना उद्धव ठाकरे यांचा बांध फुटला, असंही जाधव म्हणाले. (शिंदेंच्या ठाण्यात सेनेच्या सुषमांची गर्जना, धडाकेबाज भाषण, जिंकली शेकडो शिवसैनिकांची मनं) ‘जयचंद राठोडांमुळे त्यांचा जावई महाराणा प्रताप मोहम्मद घुरीच्या हाती लागले. एकनाथ शिंदे आज तुम्ही भाजपाच्या नादी लागून हेच केलंय. एक ना एक दिवस तुम्हाला जयचंद राठोड सारखा फक्त आणि फक्त पश्चातापच करावा लागेल. हा सर्व डाव भारतीय जनता पार्टीचा आहे. हे फक्त पॅदे आहेत, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली. उद्या कोणतीही निवडणुक येवू द्या त्यात फक्त उद्धव ठाकरे यांचा भगवा फडकला. परवाचे भाषण BKC वरचे ते भाषण नव्हते वाचन होते ते भाषण कोणी लिहून दिले होते ते देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिले होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले होते कीस संपुर्ण भाषण वाचल्या शिवाय मानवर केली तर याद राखा, असं म्हणत भास्कर जाधव य़ांनी एकनाथ शिंदे यांची BKC यांच्या भाषणाची नक्कल केली. काही बोलायचे झाले की, देवेंद्र फडणवीस आणि ते सारखं बोलतात कारण त्यांना माहितीये एकदा माईक घेचलाय कधी खुर्ची खेचतील माहिती नाही, असा टोलाही भास्कर जाधवांनी लगावला. ( शिवसेनेचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाविरोधात अखेर दिल्ली कोर्टात धाव ) गिरीश महाजन यांना आम्ही गिरीजा बोलतो. एकनाथ शिंदे माझे चांगले मित्र आहेत. भाजपाची माणसे एकनाथ शिंदे यांच्या ॲाफिसमध्ये कायम बसलेली असतात. सध्या किरीट सोमाया कुठे आहेत लोकं विचारतात. मी लोकांना सांगतो ते देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बोलायची प्रॅक्टिस करतायेत, अशी खिल्लीही भास्कर जाधव यांनी सोमय्यांची उडवली. नीती आयोगाच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस सोबत होते तेव्हा मुख्यमंत्र्यांना पहिल्या रांगेत बसवले पण जेव्हा एकटे गेले तेव्हा तिस-या रांगेत बसवले. एकनाथराव तुमच्या हातून हे शिवसेना संपवून घेतायेत हे तुमचे नाव शिंदेशाही म्हणुन नाही तर मोगलशाही आहे.  कपट कारस्थानामध्ये तुमच्या नावावर असेल. इतिहासाच्या दोन पानावर नावे लिहिली जातील एका पानावर गद्दार आणि दुसऱ्या पानावर खुद्दार म्हणून नाव राजन विचारे यांचे लिहिले जाईल, असंही भास्कर जाधव म्हणाले. (‘56 वर्षात कोणालाही जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं’, सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा ‘बाण’) बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क या भाजपानेच काढला होता. भाजपाच्या मतावर आम्ही निवडून आलो आम्ही ५६ निवडून आलो तर ते १०५ निवडणून आले. २०१४ च्या आधी मोदींचा फोटो कधी होता का? बॅनरवर मोदींना पंतप्रधान व्हायचे होते म्हणून शिवसेनेशी युती केली. नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा फोटो आमच्या बॅनरवर होता तेव्हा ५६ निवडून आले जेव्हा फोटो नव्हते तेव्हा ६३ निवडून आले, असंही जाधव यांनी ठणकावून सांगितलं. ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं तेव्हा का नाही बोलले की आम्ही पक्षांसोबत आहोत का त्यांनी मंत्रिपदाची शपथ का घेतली अजितदादांनी भाजपासोबत सरकार स्थापन केले होते, ते टिकले असते तर तुम्ही कधीच मुख्यमंत्री झालाच नसता. आजचे मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मिळालंय. उद्धव ठाकरे राष्ट्रवादीसोबत गेल्यानेच त्यांना हे पद मिळालंय, असा दावाही भास्कर जाधवांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या