मुंबई, 6 मे : देशात आज दोन महत्वाच्या घटना घडत आहेत. एकडीकडे भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी आज रात्री (6 मे) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासाठी भोजनाचं आयोजन केलं होतं. त्यामुळे अनेक प्रकारच्या उलटसुलट चर्चांना प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामान्यात बंगालचा खेळाडू वृद्धीमान साहाने गुजरातसाठी जोरदार बॅटींग केली. बंगाल टायगरची डिनर डिप्लोमसी भारतीय जनता पक्ष (BJP) गांगुलीला आपल्या पक्षात घेण्यासाठी आधीपासूनच प्रयत्नात असल्याच्या चर्चा आहेत. गेल्या वर्षी झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीच्या आधीही या चर्चांनी जोर धरला होता. त्या निवडणुकीत भाजप जिंकल्यास गांगुलीला पश्चिम बंगालचं (West Bengal CM) मुख्यमंत्रिपद देऊ करण्यात आलं होतं, अशीही चर्चा होती; मात्र, सौरव गांगुलीने अद्याप कोणतीही राजकीय इच्छा प्रदर्शित केलेली नाही. अमित शाह यांच्या शुक्रवारच्या अत्यंत बिझी दौऱ्यामध्ये गांगुलीच्या घरी जाण्याचा बेत नाही. व्हिक्टोरिया मेमोरियल येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. तेथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या मुक्ती मात्रिका या कार्यक्रमात सौरव गांगुली यांची पत्नी आणि प्रसिद्ध नृत्यांगना डोना गांगुली नृत्य सादर करणार आहे. त्यानंतर अमित शाह सौरव गांगुली यांच्या बेहाला इथल्या निवासस्थानी जाणार होते. तिथे सौरव यांनी त्यांच्यासाठी मेजवाणी आयोजित केली आहे. मुंबई-गुजरातच्या सामन्यात रणवीर सिंगच्या लूकची चर्चा! हिटमॅनच्या सिक्सवर अशी दिली Reaction की.. बंगाल खेळाडूची गुजरातसाठी खेळी मुंबई इंडियन्सने दिलेलं 178 धावांचं लक्ष्य घेऊन उतरलेल्या गुजरात टायटन्ससाठी आज बंगालच्या खेळाडून जोरदार सुरुवात करुन दिली. गुजरातसाठी शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी डावाची सुरुवात केली. गुजरात टायटन्सचे सलामीवीर शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा यांनी झटपट फटकेबाजी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. या डावात या दोघांनीही मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढली. अखेर मुंबई इंडियन्सला ऋद्धिमान साहाच्या रूपाने दुसरं यश मिळालं. अश्विनने त्याच षटकात आधी गिल आणि नंतर साहाला बाद केले. ऋद्धिमान साहाने 40 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. पश्चिम बंगालचे दोन खेळाडूंची गुजरातसाठी बॅटींग एकीकडे कोलकातामध्ये बंगाल टायगर गांगुली गृहमंत्री अमित शाहंसाठी मेजवानीचे आयोजन करत आहे. तर दुसरीकडे ऋद्धिमान साहाने आज गुजरातसाठी उत्कृष्ट खेळी केली आहे. ममता दीदींच्या बंगालचे दोन खेळाडू सध्या गुजरातच्या कामाला येत असल्याचे म्हटले तर वावगं ठरू नये. असं असलं तरी या दोन्ही गोष्टी निव्वळ योगायोग आहे. गांगुलीचे भाजप सरकार आणि राज्यातील ममता सरकार दोन्हींसोबत चांगले संबंध आहेत.