औरंगाबाद, 25 जुलै : राज्यभरात मराठा आंदोलनाचा वनवा पेटला आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही म्हणून शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. औरंगाबादमध्ये मराठा ठोक मोर्चाने आक्रमक स्वरूप घेतले आहे. कायगाव टोका इथं काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूनंतर मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत बंद पाळण्यात आला. कन्नडमध्ये शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षण साठी ठिय्या आंदोलन केलं होतं.
औरंगाबादमध्ये मराठा ठोक मोर्चाने आक्रमक स्वरूप घेतले आहे. कायगाव टोका इथं काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूनंतर मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत बंद पाळण्यात आला. कन्नडमध्ये शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षण साठी ठिय्या आंदोलन केलं होतं.
आंदोलनादरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी सरकारने मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी केली होती. जर सरकारने 24 तासात निर्णय घेतला नाहीतर आमदारकीचा राजीनामा देईन अशी घोषणाच जाधव केली होती. अखेर 24 तासात मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही त्यामुळे जाधव यांनी आपला राजीनामा आज विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.
हर्षवर्धन जाधव हे याआधी मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. पण राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करत त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करून सेनेत दाखल झाले होते.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून मराठा पेटलेल्या मराठा ठोक मोर्चाच्या आंदोलनावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीये. सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर, राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले. आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.