JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / कॉमनवेल्थ गेम्समध्ये सांगलीच्या संकेत सरगरला रौप्य; भारतासाठी पटकावलं पहिलं पदक

कॉमनवेल्थ गेम्समध्ये सांगलीच्या संकेत सरगरला रौप्य; भारतासाठी पटकावलं पहिलं पदक

Commomwelath Games 2022: क्लीन अँड जर्कच्या तिसऱ्या प्रयत्नात त्याला किरकोळ दुखापत झाली, त्यामुळे त्याचे सुवर्णपदक हुकले. संकेतने स्नॅचमध्ये 113 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 135 किलो वजन उचलले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 जुलै : भारतीय वेटलिफ्टर संकेत महादेव सरगरने पुरुषांच्या 55​किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं आहे. राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे पहिले पदक आहे. मलेशियाच्या बिन कसदान मोहम्मद अनिकने या खेळातील सुवर्णपदक पटकावले. त्याने एकूण 249 किलो वजन उचलले. संकेतला 248 किलो वजन उचलता आले. क्लीन अँड जर्कच्या तिसऱ्या प्रयत्नात त्याला किरकोळ दुखापत झाली, त्यामुळे त्याचे सुवर्णपदक हुकले. संकेतने स्नॅचमध्ये 113 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 135 किलो वजन उचलले. कोण आहे संकेत महादेव सरगर महाराष्ट्रातील सांगली येथील रहिवासी असलेल्या संकेत महादेव सरगरने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले होते. त्याने स्नॅचमध्ये 113 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले होते. या सुवर्णपदकासह तो 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. 21 वर्षीय संकेत महादेव सरगर खेलो इंडिया युथ गेम्स 2020 आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2020 चा चॅम्पियन होता. हे वाचा -  पाकिस्तान T20 World Cup जिंकणार नाही! रिकी पॉण्टिंगने सांगितलं कारण कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचे वेटलिफ्टिंगमध्ये 126 वे पदक - 1990, 2002 आणि 2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने वेटलिफ्टिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात वेटलिफ्टिंगमध्ये 126 पदकांसह भारत हा दुसरा सर्वात यशस्वी देश आहे. या खेळांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत केवळ ऑस्ट्रेलियाने (159) त्याहून अधिक पदके जिंकली आहेत. 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टर्सनी वर्चस्व गाजवले, 5 सुवर्णांसह नऊ पदके जिंकली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या