JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Star Pravah: स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेबाबत प्रेक्षकांचा नाराजीचा सूर

Star Pravah: स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेबाबत प्रेक्षकांचा नाराजीचा सूर

(Rang Majha Vegala) रंग माझा वेगळा या मालिकेचा चालू ट्रॅक फारच कंटाळवाणा आणि निरस होत आहे अशी प्रतिक्रिया समोर येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 20 जून: प्रेम आणि मराठी मालिका यांचं नातं फार जुनं आहे. आजही अनेक प्रेक्षक मालिकेच्या कथानकाशी खूप जोडलेले असतात हे पाहायला मिळत. पण जेव्हा मालिका अवास्तव काहीतरी दाखवायला लागतात तेव्हा मात्र स्वतः प्रेक्षकच कंटाळतात. अशीच वेळ सध्या स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील एका मालिकेवर आली आहे. या मालिकेचं कथानक एका भलत्याच ट्रॅकवर गेलं असून आता प्रेक्षक सुद्धा बरेच नाराज झाले आहेत. स्टार प्रवाहावरील ही मालिका म्हणजे (Rang Majha Vegala) ‘रंग माझा वेगळा’. नावाप्रमाणेच एक वेगळी प्रेमकहाणी यामध्ये एवढे दिवस पाहायला मिळत होती. मात्र मालिकेतील हिरो आणि हिरोईनच्या नात्यात दुरावा आल्यापासून या मालिकेचा ट्रॅक भरकटताना दिसतो आहे. या मालिकेतील हिरोईन दीपचं वागणं लोकांना आता मूर्खपणाचं वाटत आहे. आणि प्रेक्षक सुद्धा कंटाळून आता मालिका बंद करा असं म्हणायला लागले आहेत. या मालिकेचा नवा प्रोमो आज वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर झाला असून त्यात दीपा मंगळसूत्र काढून कार्तिकच्या हातात देते आणि त्याला आयेशाशी लग्न करायची शपथ घालते. हा प्रोमो आल्यापासूनच त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी टीकेचा सूर धरला आहे. एक युजर म्हणतो ‘अजून किती दिवस असं भांडत राहणार?’ तर दुसऱ्या युजरने ‘ही तुमची दीपा जास्तच अतीशहाणी आहे वैताग आलंय तिच्या शहाणपणाचा ….तिलाच कुठे जेत्रेत हरवून टाका एकदाचे…’ असं म्हणलं आहे. एका प्रेक्षकाने ‘आजारी होती म्हणुन मुंबई ला आली खोकला तर गायब झाला आता ती एकदम बरी आहे बस आत्ता कार्तिक लग्नाला उभा राहिला की ही अडवि पडेल झाला अजून स्टोरी लांबली शि बाबा कंटाळा आला आहे काहीच interesting नाहिये.’ असं म्हणलं आहे.

संबंधित बातम्या

अनेक प्रेक्षकांना कथनकाने घेतलेलं वळण आवडत नाहीये.दीपाचं ते सततचं रडगाणं प्रेक्षकांना नाखूष करत आहे. खलनायिकेला मिळणार अति भाव आणि त्यासमोर दीपाचा हा अति दयाळूपणा प्रेक्षकांना पटत नाहीये. दीपा अचानक नवऱ्यासाठी व्रत करते तर आता स्वतःच मंगळसूत्र काढून देते आणि स्वतःच्याच नवऱ्याचं दुसरं लग्न लावायला निघते हे असे प्रकार प्रेक्षकांच्या फारसे पचनी पडत नाहीयेत असं एकूणच दिसत आहे. हे ही वाचा- रंग माझा वेगळा मालिकेत नव्या कार्तिकीची एंट्री, ‘ही’ बालकलाकार घेणार साईशाची जागा या मालिकेला तसा फारच चांगला TRP आहे. या मालिकेच्या कास्टिंगमध्ये सुद्धा नुकताच बदल झाला. मालिकेतील कार्तिकीची भूमिका करणाऱ्या साईशा भोईरने मालिका सोडल्यावर तिच्या जागी नवी बालकलाकार मैत्रेयी दाते घेणार असून ती कार्तिकीच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेमध्ये असलेल्या समस्या सुटल्या जाणार का आणि मालिकेला इथून पुढे कसा रिस्पॉन्स मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या