JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Pichwai paintings : श्रीकृष्णाचे आयुष्य कापडावर साकारणारी 700 वर्ष जुनी राजस्थानी कला! Video

Pichwai paintings : श्रीकृष्णाचे आयुष्य कापडावर साकारणारी 700 वर्ष जुनी राजस्थानी कला! Video

Pichwai paintings : राजस्थानमधील पिछवाई पेंटिंगची चित्रकला 700 वर्षांपासून जुनी आहे. काय आहे ही कला पाहूया

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 9 जानेवारी : देशातील प्रत्येक राज्य हे वेगवेगळ्या संस्कृतीचं माहेरघर आहे. राजेशाही राजवाड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या राजस्थानममध्ये वेगवेगळ्या कला पाहायला मिळतात. राजस्थानमध्ये पिछवाई पेंटिंगची चित्रकला 700 वर्षांपासून जुनी आहे. पुण्यातील मुकुल जोशी यांनी या कलेबाबत खास माहिती सांगितली आहे. काय आहे पिछवाई कला? पिछवाई ही राजस्थानच्या प्रसिद्ध हस्तकलेपैकी एक आहे. भगवान श्रीकृष्णाचे जीवन कापडावर चित्रित करण्याच्या कलेला ‘पिछवाई कला’ म्हणतात. ही कला नाथद्वाराची (राजसमंद) प्रसिद्ध आहे. ही कला मथुरेच्या कलाकारांनी विकसित केली आहे. पिछवाई या शब्दाचा अर्थ मागील असा होतो.  ही चित्रं आकारानं मोठी असून ती कापडावर बनवली जातात. नाथद्वाराच्या श्रीनाथजी मंदिरात आणि इतर मंदिरांमध्ये ही मोठ्या आकाराची चित्रे मुख्य मूर्तीच्या मागे भिंतीवर टांगण्यासाठी वापरली जातात. पूर्वीच्याकाळी ह्या पेंटिंग आठ फुटापेक्षाही मोठ्या असायच्या मात्र सध्याच्या लोकांच्या छोट्या घरांमुळे बारा बाय बारा आकारापासून देखील पेंटिंग्स आता उपलब्ध आहेत. या छोट्या पेंटिंग आपल्याला पाचशे रुपयापासून उपलब्ध होतात तर सोडा चांदीने मडवलेला पेंटिंगची किंमत लाखांच्या घरांमध्ये आहे. छत्रपती शिवरायांनी आई जिजाऊंना लिहिलेल्या शेवटच्या पत्रात काय होतं? पाहा Video राधाकृष्णाचे वर्णन पिछवाईच्या मुख्य आकृतीमध्ये राधाकृष्णाचे वर्णन केले जाते. यामध्ये श्रीकृष्णाच्या आवडीच्या अनेक गोष्टी जसे की श्रीकृष्णाचे सोबत कमळ गाई तसेच श्रीनाथ मंदिराच्या विविध प्रतीकांचा वापर हे चित्र काढताना केला जातो हे चित्र कापडावर ती काढले जाते जेवढे कापड जुने तेवढे चित्र चांगले येते तसेच त्या चित्राची किंमतही तेवढी जास्त असते.

या चित्रणात कलाकारांनी हाताने बनवलेले दगडपासूनचे नैसर्गिक रंग वापरले जातात. रंग ठीक करण्यासाठी बाभूळ डिंक जोडला जातो. तसेच काही खास चित्रामध्ये मागणीनुसार सोन्या-चांदीचे रंगही त्यात वापरले आहेत. महागड्या पिचवाईत खऱ्या सोन्या-चांदीचे काम सजवले आहे, अशी माहिती जोशी यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या