","description":"नागपूरच्या हृदयस्थानी वसलेले अंबाझरी तलाव नागपुरातील एक महत्त्वाचे आकर्षणाचे केंद्र आहे. ","datePublished":"2022-12-23T15:57:46+00:00","dateModified":"2022-12-23T15:57:46+00:00","image":{"@type":"ImageObject","url":"assets/1.jpeg","width":"1280","height":"960"},"author":{"@type":"Organization","name":"News18 India "},"publisher":{"@type":"Organization","name":"News18 Lokmat","logo":{"@type":"ImageObject","url":"assets/9.jpeg"}}}
नागपूरच्या हृदयस्थानी वसलेले अंबाझरी तलाव हे नागपुरातील एक महत्त्वाचे आकर्षणाचे केंद्र आहे.
अंबाझरी तलावाच्या परिसरात हिरवाईने नटलेला परिसर, उत्तम प्रकाश योजना आणि I Love My Nagpur चा सेल्फी पॉईंट हे एक आकर्षणाचे केंद्र आहे.
अंबाझरी तलावाच्या ‘ओव्हर फ्लो पॉईंट’वर 51 फूट उंच विवेकानंद स्मारक उभारण्यात आले आहे.
अंबाझरी तलाव 146 वर्षे जुना असून हेरिटेज श्रेणी ‘अ’ मध्ये तो समाविष्ट करण्यात आला आहे.
अंबाझरी ओव्हर फ्लो पॉइंट जवळूनच नागपूर मेट्रो जात असल्याने नागपूर मेट्रोच्या पिल्लरवर उडत्या बगळ्यांची आकर्षक सजावट केली आहे.
स्मारकाच्या खालील भागात स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चित्रावर आधारित गॅलरी तयार करण्यात आली आहे.
स्मारकाच्या खालचा भागात चारही बाजूंनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर आधारित काही प्रसंग म्युरल स्वरूपात तयार करण्यात आले आहे.