मुंबई, 21 फेब्रुवारी : प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. जेव्हा जास्त घाम येतो तेव्हा ते स्वच्छ करण्यासाठी आपण दररोज शॅम्पू वापरण्यास सुरुवात करतो. यामुळे केसांचे नैसर्गिक तेल कमी होऊ लागते. केस कोरडे होऊ लागतात आणि कोमेजायला लागतात. त्यामुळे आपण बऱ्याचदा आपल्या केसांना कंडिशनिंग करण्याला प्राधान्य देतो. केस मऊ आणि सुटसुटीत राहण्यासाठी केसांना कंडिशनिंग करणे खूप महत्वाचे आहे. परंतु जर तुम्ही केसांमध्ये कंडिशनरचा जास्त वापर करत असाल तर केसांमध्ये इतर प्रकारच्या समस्या सुरू होतात. चला तर मग जाणून घेऊया केसांना जास्त प्रमाणात कंडिशनर लावल्यास काय दुष्परिणाम होऊ शकतात आणि ओव्हर कंडिशनिंगपासून कसे वाचावे.
Health Tips : कमी वयात पांढरे होतायत केस? दुर्लक्ष टाळा, या गंभीर त्रासांचे असू शकते लक्षणजास्त प्रमाणात कंडिशनर लावण्याचे दुष्परिणाम - केसांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्टायलिंग करणे शक्य होत नाही. - खूप कमी वेळात तुम्हाला केस परत धुवावे लागतील. - केस खूप चिकट होतात आणि केस सांभाळणे कठीण होऊन जाते.
कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत - जेव्हा तुम्ही तुमचे केस शॅम्पू करा, तेव्हा प्रत्येक वेळी ते कंडिशन करा. - लावल्यानंतर एक ते दोन मिनिटे केसांवर कंडिशनर राहू द्या. - जास्तवेळ केसांमध्ये कंडिशनर राहिल्यास केस तेलकट होऊ शकतात. - कंडिशनर टाळूवर न लावता केसांना लावा. ओव्हर कंडिशनिंगपासून केस असे वाचवा - केसांमध्ये अतिरिक्त कंडिशनर लावले गेले तर केस कोरडे झाल्यानंतर केसांमध्ये स्निग्ध डाग दिसू लागल्यास, तेथे ड्राय शॅम्पू वापरता येईल. - महिन्यातून एकदा अप्पल सायडर व्हिनेगरने केस धुवा. यासाठी अर्धा कप ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये 3 कप पाण्यात मिसळा आणि त्याने केस धुवून पुसून घ्या. - ओव्हर कंडिशनिंगमुळे केस चिकट वाटत असतील तर मग एका मगमध्ये पाणी आणि लिंबू पिळून ओले केस धुवा. नंतर पुसून घ्या. यामुळे केस ताजे दिसतील. या उपायांनी रोज सकाळी पोट सहज होईल साफ, दिवसभर राहाल Fresh आणि Energetic (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)