मुंबई 7 जून: अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra-Nick Jonas) आणि निक जोनस यांची जोडी भलतीच फेमस आहे. या क्युट जोडीबद्दल अनेकांना भारी उत्सुकता आहे. अमेरिकन पॉप सिंगर निक जोनसचा चाहतावर्ग तर देशभर पसरला आहे. पण निक सोबत नुकताच एक अपघात झाल्याचं समोर येत आहे. हे ऐकून त्याच्या चाहत्यांना चिंता वाटत आहे. नक्की काय झालं निक सोबत?
निकचा (Nick Jonas Injury) सॉफ्टबॉल खेळताना अपघात झाल्याचं समोर येत आहे. त्याला सॉफ्टबॉल खेळात पायाला दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे. निक हा कायमच सॉफ्टबॉल खेळात दिसतो. त्याच्या पायाला दुखापत झाल्यानंतर त्याला तात्काळ इमर्जन्सी रूम मध्ये दाखल करण्यात आलं. यासंबंधी निकचे काही फोटोस सुद्धा प्रचंड viral होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये निक सॉफ्टबॉल खेळाच्या जर्सीमध्ये दिसत आहे. त्याच्या भावासोबत अर्थात केविन जोनस सोबत त्याचे हॉस्पटलजवळचे फोटो सुद्धा यात दिसत आहेत.
निक हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्याला इमर्जन्सी रूममध्ये नेण्याची व्यवस्था केली होती. पण दोघेही भाऊ चुकीच्या रूमपाशी गेल्याने निकला लंगडत पुन्हा गाडीपाशी यावं लागलं. या संबंधी ‘पेज सिक्स’ कडून वृत्त मिळाल्यावर निकचा एक विडिओ सुद्धा viral झाला ज्यात तो लंगडताना दिसत आहे. निकला असं लंगडताना पाहून अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे.
एका युजरने कमेंट करत ‘प्रियांकाला अशा पद्धतीने टेन्शन देणं कमी कर’ असा त्याला सल्ला दिला आहे. तर अनेकांनी त्याला लवकर बरं वाटावं म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.
निकचा हा सॉफ्टबॉल गेम याआधी सुद्धा चर्चेत आला होता. मागे अशाच एका गेमला बायको प्रियांकाने सुद्धा हजेरी लावली होती. खेळ सुरु होण्याआधी हे क्युट कपल एकमेकांसोबत काही प्रेमाचे क्षण घालवताना कैद झालं होतं. त्यांचा किस करतानाच फोटोसुद्धा खूप viral झाला होता.
निक आणि प्रियांका यांचं खाजगी आयुष्य नेटकऱ्यांचा चर्चेचा विषय ठरत आला आहे. या कपलने जानेवारी महिन्यात सरोगसीचा मदतीने एका बाळाला जन्म दिला. त्यांच्या मुळीच नाव मालती मेरी चोप्रा जोनस असं आहे. दोघांनी त्यांच्या मुलीचं ठेवलेलं हे युनिक नाव चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.