JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / नंदुरबार : गेल्या वर्षीच्या तुलनेत कुपोषित वाढले, पण कोरोनाच्या भीतीने पोषण केंद्राकडं पाठ, पावसाळ्यात स्थिती गंभीर होण्याची शक्यता

नंदुरबार : गेल्या वर्षीच्या तुलनेत कुपोषित वाढले, पण कोरोनाच्या भीतीने पोषण केंद्राकडं पाठ, पावसाळ्यात स्थिती गंभीर होण्याची शक्यता

Nandurbar malnutrition news कोरोनाच्या भीतीमुळं पालक बालकांना इथं घेऊनच येत नसल्यानं जिल्ह्यातले महत्वाचे पोषण पुर्नसवसन केंद्र ओस पडले आहेत. अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातील पोषण पुर्नवस केंद्रातही एकही बालक दाखल नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नंदुरबार, 29 मे : राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus) कहरामध्ये नंदुरबारमधल्या (Nandurbar) कुपोषणाच्या मुद्द्याकडं प्रशासनाचं काहीसं दुर्लक्ष झाल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नंदुरबारमध्ये कुपोषणाचं (Malnutrition) प्रमाण वाढलं आहे. मात्र असं असताना कोरोनोच्या भीतीपोटी आदिवासी पालक मुलांना पोषण पुर्नवसन केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यास घाबरत आहेत. अशी दुहेरी भीतीदायक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळंच पावसाळ्यात कुपोषणाची स्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे. (Nandurbar malnutrition news) (वाचा- आता राज्यांना स्वतः कंपनीकडून विकत घ्यावं लागणार रेमडेसिवीर; केंद्र नाही करणार.. ) आदिवासी बहुल भाग असलेल्या नंदुरबार कुपोषणासाठी राज्यात कुप्रसिद्ध आहे. कोरोना काळात कुपोषणाची स्थिती अधिकच गंभीर बनली. एप्रिल 2020 च्या तुलनेत यंदा 2508 ने कुपोषितांचा आकडा वाढला आहे. नंदुरबारमध्ये एप्रिल अखेरीस 9421 बालकं कुपोषित आहेत. त्यापैकी 8921 बालकं मॅम श्रेणीतील तर 908 बालकं सॅम म्हणजे तीव्र स्वरुपातल्या कुपोषित श्रेणीतील आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये कपोषींताचा हाच आकडा 6921 होता. (वाचा- Covid रुग्णालयातून बायकोचं तर विलगीकरण कक्षातून नवऱ्याचं पलायन, 4 तासांनी सापडले ) एकिकडं कुपोषितांचा आकडा वाढला आहे, मात्र तीव्र कुपोषीत बालकांच्या पोषण आणि उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या पोषण पुर्नवसन केंद्राकडं आदिवासी पालक पाठ फिरवत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळं पालक बालकांना इथं घेऊनच येत नसल्यानं जिल्ह्यातले महत्वाचे पोषण पुर्नसवसन केंद्र ओस पडले आहेत. अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातील पोषण पुर्नवस केंद्रातही एकही बालक दाखल नाही. पावसाळ्यात स्थिती गंभीर होण्याची शक्यता अक्कलकुवा प्रमाणेच दुर्गम भागातील, मोलगी, धडगाव, तळोदा येथील पोषण पुर्नवसन केंद्रांची अवस्थाही तशीच आहे. याठिकाणचे पोषण पुर्नवसन केंद्रदेखील उपचारासाठी कुपोषित बालकांच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळं अनेक केंद्रांमध्ये जिल्हा प्रशासनानं लसीकरण मोहीम सुरू केली आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णलायासारख्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणी फक्त 03 कुपोषित बालकं दाखल आहेत. त्यामुळंच पावसाळ्यात कुपोषणाची स्थिती भयावह होण्याची भिती स्वत डॉक्टर व्यक्त करत आहे. मुलांवर गाव पातळीवर घरीच उपचार अंगणवाडीमार्फत तीव्र कुपोषित मुलांना एनआरसीमध्ये दाखल करण्याची जबाबदारी अंगणवाडीसेविकांवर आहे. पण कोरोनाकाळात आदिवासी बहुल भागातील पालक याठिकाणी येण्यास घाबरत आहेत. तरी सध्या गाव पातळीवर 748 व्हीसीटीसीच्या माध्यमातून 1144 बालकांवर घरीच उपचार सुरू असल्याचं महिला बालकल्याण विभागाचं म्हणणं आहे.  एखाद्या बालकाची तीव्र कुपोषणाकडे वाटचाल झाल्यास त्याला तत्काळ दाखल करण्याच्या सुचनाही देण्यात आल्याचं महिला बालविकास अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. सध्या नंदुरबारमधला कुपोषणाचा आकडा 10 हजारांच्या घरात आहे. तरी प्रत्यक्ष परिस्थीती याहुन भयावह असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुर्गम अतिदुर्गम भागात अशा कुपोषीत बालकांना वेळीच उचारासाठी दाखल नाही केलं तर पावसाळ्यात बालमृत्युचा आकडा वाढू शकतो. तसं झाल्यास पुन्हा प्रशासनाला जबाबदार ठरवलं जाऊ शकतं. त्यामुळं पालकांची भीती घालवून वेळीत मुलांना पोषण केंद्रात आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या